नगरपरिषद बल्लारपूर शिक्षण विभागाचा ” प्रोजेक्ट अरुणोदय” अंतर्गत बक्षीस वितरण सोहळा संपन्न
ज्योत्स्ना वानखेडे:
नगर परिषद बल्लारपूर शिक्षण विभागाच्या “प्रोजेक्ट अरुणोदय” अंतर्गत आयोजित भव्य बक्षीस वितरण सोहळा गोंडराजे खांडक्या बल्लारशाह नाट्यगृह, बल्लारपूर येथे उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्षा मा. डॉ. अलका वाढई मॅडम, मुख्याधिकारी मा. विशाल वाघ सर, उपाध्यक्ष मा. देवेंद्र आर्य सर, उपमुख्याधिकारी मा. रविंद्र भंडारवार सर, मा. शरीफ शेख सर, मा. भास्कर माकोडे सर, महिला व बालकल्याण समिती सभापती ॲड. मेघा भाले मॅडम, महिला व बालकल्याण समिती उपसभापती मा. शिल्पा चुटे तसेच नगरसेविका सौ. सुनीता जीवतोडे, सौ. वैशाली हुमणे, सौ. मोना धनोरकर, अंकु बुक्या आणि नगरसेवक अविनाश मठ्ठा, निरज झाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी “प्रोजेक्ट अरुणोदय” स्मरणिकेचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
“प्रोजेक्ट अरुणोदय” अंतर्गत शाळांचे मूल्यांकन प्रोजेक्टरद्वारे सादर करण्यात आले. उपमुख्याधिकारी मा. रविंद्र भंडारवार सर यांनी प्रेझेंटेशनद्वारे उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
स्पर्धेतील विजेत्या शाळा :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा — ₹३ लाख
साईबाबा प्राथमिक शाळा — ₹२ लाख
विजयालक्ष्मी प्राथमिक शाळा — ₹१ लाख
तसेच “स्टुडंट ऑफ द इयर” म्हणून प्रत्येक शाळेतील निवडक विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापक कडूकर सर, रैला सर, केशकर सर, राजेंद्र गुढधे सर, भलवे सर, राठोड सर तसेच सर्व शिक्षकवृंद, पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षणाच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी “प्रोजेक्ट अरुणोदय” हा एक प्रेरणादायी उपक्रम ठरत असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नक्कीच नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.