Monday, June 22, 2026
Homeबल्लारपूरगौरक्षण वार्डात अवैध रेतीचा साठ्याद्वारे वर्दळीच्या रस्त्याची अडवणूक; कार्यवाहीची मागणी
spot_img

गौरक्षण वार्डात अवैध रेतीचा साठ्याद्वारे वर्दळीच्या रस्त्याची अडवणूक; कार्यवाहीची मागणी

गौरक्षण वार्डात अवैध रेतीचा साठ्याद्वारे वर्दळीच्या रस्त्याची अडवणूक; कार्यवाहीची मागणी

*ज्योत्स्ना वानखेडे*:
बल्लारपूर तालुक्यात रेती घाटाचा लिलाव न झाल्यामुळे सर्रासपणे रेती माफिया सर्व नियम धाब्यावर बसवून रेतीची अवैध तस्करी  करीत  आहे. बल्लारपूर  तालुक्यातील वर्धा नदी,भागीरथी नाला, इटोली नाला इत्यादी स्थाना वरून अवैधपने रेती ची तस्करी सुरू आहे. रात्र दिवस जेसीबी द्वारे ट्रॅक्टरच्या साह्याने रेती उपसून शहरातील खाली प्लाट,रस्त्याच्या कडेला मोठया प्रमाणावर रेतीचा साठा उभा केल्या जात आहे. त्यामुळे रहदारीस अडचण निर्माण होऊन जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच अपघात होण्याचा धोका बळावला आहे, या रेती चोरी कडे महसूल प्रशासनाने  पूर्णपणे कानाडोळा केला आहे या बाबत चौकशी केली असता रेती तस्कर रेती मनमान्य किमतीत देऊन शासनाला मोठया प्रमाणात चुना लावत आहे या बाबत तहसीलदार बल्लारपूर यांनी सदर रेती साठ्याची चौकशी करून कार्यवाही करावी तसेच शहरातील वार्डात रेती चा साठा रेती तस्करा द्वारे रस्त्याच्या कडेला साठवणूक करून रहदारीच्या रस्ता अडवल्या जात आहे या बाबत नगर परिषद मुख्याधिकारी यांनी लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी जनतेद्वारे करण्यात येत आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page