Thursday, July 9, 2026
HomeEducationआ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी
spot_img

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी

आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूरच्या आरोग्य शिक्षणाला नवी दिशा

आ. मुनगंटीवार यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्र्याकडे सातत्याने केला होता पाठपुरावा; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

चंद्रपूर येथील कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात होणार शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची स्थापना; १०० विद्यार्थ्यांची वार्षिक प्रवेश क्षमता



*Jyotsna Wankhede* : चंद्रपूर येथे शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय सुरू व्हावे, यासाठी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. २९ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी सविस्तर निवेदन सादर करून कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर येथे १०० विद्यार्थ्यांच्या वार्षिक प्रवेश क्षमतेचे शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्याची आग्रही मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले असून शासनाने चंद्रपूर येथे शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चंद्रपूरच्या आरोग्य व शिक्षण क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे. शासनाच्या निर्णयानुसार चंद्रपूर येथील कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची स्थापना करण्यात येणार असून, या महाविद्यालयाला १०० विद्यार्थ्यांची वार्षिक प्रवेश क्षमता असणार आहे. त्यामुळे चंद्रपूर व परिसरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण नर्सिंग शिक्षणासाठी बाहेर जावे लागणार नाही. तसेच जिल्ह्यात प्रशिक्षित परिचारिकांची उपलब्धता वाढून आरोग्य सेवेलाही मोठी बळकटी मिळणार आहे.

या निर्णयामुळे चंद्रपूरमध्ये उभारण्यात येणाऱ्या शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयामुळे आरोग्य शिक्षणाची पायाभूत सुविधा अधिक सक्षम होणार असून, प्रशिक्षित परिचारिका तयार करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व्यवस्था बळकट होईल. परिणामी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेलाही मोठी ताकद मिळणार आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण पाठपुराव्यामुळे चंद्रपूरच्या आरोग्य व शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळणार असून, स्थानिक विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण नर्सिंग शिक्षणाचे नवे दालन खुले होणार आहे. तसेच जिल्ह्यात प्रशिक्षित परिचारिकांची उपलब्धता वाढून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मोठी मदत मिळणार आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page