*मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी साजरी*
*ज्योत्स्ना वानखेडे*
मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्या असमा खान मॅडम यांनी डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.
तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सौम्या शिवानंद पेंदे, माही सुबोध कासोटे, श्रद्धा रवींद्र चिंतलवार, वैष्णवी विक्तूबाबा कामटकर या सर्व इयत्ता चौथी व मुस्कान इरफान शेख, आयुषी सुजित पुसाम वर्ग सातवा या विद्यार्थिनींचा शाळेच्या प्राचार्य यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याचा व विचारांचा विद्यार्थिनींनी आदर्श घ्यावा, कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर मोठे यश मिळवावे, असे शाळेच्या प्राचार्या यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होते.