मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पालक शिक्षक सभा संपन्न
*ज्योत्स्ना वानखेडे*:
मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दिनांक: 28/07/2026 ला दुपारी 3:00 वाजता पालक शिक्षक सभेचे आयोजण करण्यात आले. या सभेचे अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय आसमा खान खलीदी मॅडम असून पर्यवेक्षिका सुनिता कांबळे मॅडम तसेच पालक वर्गातील आरिफा शेख रुमाना तस्किन व विद्या बोरकर हे मंचावर उपस्थित होत्या.
मंचावर उपस्थितांच्या हस्ते सरस्वती माता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलीत करण्यात आले. मंचावरील सर्व मान्यवारांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता सखी सावित्री समिती बद्दल जोशी मॅडम यांनी मार्गदर्शन केले व शबाना मॅडम यांनी विद्यार्थी सुरक्षा समिती बद्दल मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे संजय ठोंबरे सर यांनी व्यावसायिक मार्गदर्शन केले.
त्यानंतर पर्यवेक्षिका सुनीता कांबळे मॅडम यांनी शाळेतील नियम व शिस्त बद्दल याबद्दल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे अध्यक्षीय भाषण शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय आसमा खान खलिदी मॅडम यांनी दिले. संचालन वैशाली गेडाम मॅडम यांनी केले तर आभार नजमी सिद्दिकी मॅडम यांनी मानले.