Monday, August 17, 2026
spot_img
HomeCrime*रामनगर पोलीस स्टेशनच्या जबरी चोरीच्या गुन्ह्याची स्थानिक गुन्हे शाखेकडून उकल; आंतरजिल्हा...

*रामनगर पोलीस स्टेशनच्या जबरी चोरीच्या गुन्ह्याची स्थानिक गुन्हे शाखेकडून उकल; आंतरजिल्हा आरोपी जेरबंद ₹3.14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, तीन गुन्हे उघडकीस*

*रामनगर पोलीस स्टेशनच्या जबरी चोरीच्या गुन्ह्याची स्थानिक गुन्हे शाखेकडून उकल;  आंतरजिल्हा आरोपी जेरबंद ₹3.14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, तीन गुन्हे उघडकीस*

*ज्योत्स्ना वानखेडे*:

मागील काही दिवसांत चंद्रपूर शहरात घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच दाखल गुन्ह्यांची उकल करण्याच्या अनुषंगाने मा. श्री. आयुष नोपानी, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर व मा. श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी वेगवेगळी पथके गठित करून शहरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले होते.

सदर तपासादरम्यान प्राप्त तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस स्टेशन रामनगर, अप.क्र. 1004/2026, कलम 304(2), 3(5) भारतीय न्याय संहिता, 2023 मधील दोन आरोपींची ओळख निष्पन्न करून त्यांचा शोध सुरू केला.

सदर गुन्ह्यात फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आली होती. गुन्ह्याची उकल करण्यासाठी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, उपलब्ध तांत्रिक माहिती तसेच गोपनीय बातमीदारांकडून प्राप्त माहितीचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले. त्यातून आरोपींची ओळख व त्यांच्या हालचालींबाबत महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त झाली.

तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेची पथके तात्काळ अकोला जिल्ह्यात रवाना करण्यात आली. पथकाने दहीहांडा परिसरात शोधमोहीम राबवून सदर गुन्ह्यातील आरोपी

1) *मुस्तफा उर्फ शानू जमील खान*, वय 44 वर्ष, रा. लाल स्कूल, उस्मानिया मदरसे जवळ, मोमीनपुरा, नागपूर

व 2) *सलमान अब्दुल रेहमान*, वय 25 वर्ष, रा. कुरेशीनगर, दहीहांडा, जि. अकोला  यांना शोधून ताब्यात घेतले.

दोन्ही आरोपींकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्यांचा सदर गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला. त्यांच्याकडून गुन्ह्यातील तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

*आरोपींकडून जप्त मुद्देमाल*

*1) मुस्तफा उर्फ शानू जमील खान यांच्याकडून*

गुन्ह्यात वापरलेला मोबाईल, बजाज पल्सर मोटरसायकल, हेल्मेट, कॉलेज बॅग तसेच गुन्ह्याच्या वेळी वापरले कपडे असा अंदाजे *₹84,000/-* किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

*2) सलमान अब्दुल रेहमान यांच्याकडून*

गुन्ह्यात वापरलेला मोबाईल तसेच सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीतून प्राप्त रक्कम व इतर मालमत्ता असा अंदाजे *₹2,30,500/-* किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अशाप्रकारे दोन्ही आरोपींकडून एकूण *₹3,14,500/-* किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण, तांत्रिक कौशल्य, गोपनीय माहिती आणि आंतरजिल्हा शोधमोहीम यांच्या आधारे आरोपींचा माग काढून सदर जबरी चोरीच्या गुन्ह्याची उकल केली आहे.

आरोपी *मुस्तफा उर्फ शानू जमील खान* यांच्याविरुद्ध नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वीही जबरी चोरी व चोरीसदृश गुन्हे नोंद असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. आरोपीकडे अधिक चौकशी केली असता नागपूर शहरातील पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी करून सुमारे 34 तोळे सोन्याचे दागिने चोरी केल्याची माहिती त्यांच्याकडून प्राप्त झाली. त्या अनुषंगाने संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क साधून माहितीची खातरजमा केली असता सदर घटनेबाबत गुन्हा नोंद असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीच्या पूर्व गुन्हेगारी इतिहासाची अधिक माहिती घेण्यात येत असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

*उघडकीस आलेले गुन्हे*

1.  *पोलीस स्टेशन रामनगर, अप.क्र. 1004/2026, कलम 304(2), 3(5) BNS* — जबरी चोरी.

2.  *पोलीस स्टेशन रामनगर, अप.क्र. 996/2026, कलम 304(2), 3(5) BNS* — जबरी चोरी.

3.  *पोलीस स्टेशन पाचपावली, नागपूर शहर, अप.क्र. 489/2026, कलम 331(4), 305(अ), 3(5) BNS* — घरफोडी/चोरी.

अशाप्रकारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा आंतरजिल्हा स्तरावर कौशल्यपूर्ण शोध घेऊन दोन जबरी चोरीचे गुन्हे व नागपूर शहरातील एक घरफोडीचा गुन्हा असे एकूण *तीन गुन्हे उघडकीस* आणण्यात यश मिळविले आहे.

दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कायदेशीर तपासकामी *पोलीस स्टेशन रामनगर, चंद्रपूर* यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर कारवाई मा. श्री. आयुष नोपानी, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर व मा. श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक *अमोल काचोरे*, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page