Tuesday, August 18, 2026
spot_img
HomeProjectमूल–चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पाठपुरावा फळाला

मूल–चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पाठपुरावा फळाला

मूल–चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पाठपुरावा फळाला

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन, संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकापासून प्रत्यक्ष पाहणीपर्यंत आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा सतत पाठपुरावा

महामार्गावरील मोठ्या प्रमाणातील खड्डे बुजविण्याचे काम पूर्णत्वास;उर्वरित पॅचेस वर्क व शोल्डर वर्कही युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या आ. मुनगंटीवार यांच्या सूचना



*Jyotsna Wankhede*: मूल-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 वरील जीवघेणे खड्डे आणि रस्त्याची झालेली दुरवस्था दूर करून हा महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा अखेर फळाला आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. नितीनजी गडकरी यांना निवेदन देऊन या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधल्यानंतर आ. मुनगंटीवार यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर महामार्गावरील मोठ्या प्रमाणातील खड्डे व पॅचेस बुजविण्यात आले आहेत. आता उर्वरित पॅचेस वर्क आणि शोल्डर वर्कचे कामही अंतिम टप्प्यात असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आज आ. मुनगंटीवार यांनी महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.

मूल-चंद्रपूर महामार्गाची दुरवस्था, वाढता अपघातांचा धोका आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सुरुवातीपासूनच हा प्रश्न गांभीर्याने घेतला. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे महामार्गाच्या दुरुस्तीची तातडीची मागणी करण्यात आली. त्यानंतर ६ ऑगस्ट २०२६ रोजी चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत रस्त्यावरील जीवघेणे खड्डे तातडीने बुजविणे, आवश्यक त्या ठिकाणी पॅचेस वर्क करणे तसेच शोल्डर वर्क पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या होत्या. १५ ऑगस्टपूर्वी आवश्यक दुरुस्ती पूर्ण करण्याची मुदतही त्यांनी दिली होती.

या बैठकीनंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने संबंधित कंत्राटदाराला तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. आवश्यक यंत्रसामग्री व रोड मटेरियल उपलब्ध करून महामार्गावरील खड्डे बुजविणे, पॅचेस करणे आणि दोष निवारणाचे काम वेगाने हाती घेण्यात आले. त्यामुळे गेल्या काही दिवसांत रस्त्यावरील मोठ्या प्रमाणातील खड्डे बुजविण्यात आले असून महामार्गाच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे.

१५ ऑगस्ट रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता श्री. केळकर यांच्यासोबत मूल–चंद्रपूर महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी रस्त्यावरील दुरुस्ती झालेल्या भागांची पाहणी करण्यासोबतच उर्वरित खड्डे, पॅचेस वर्क आणि शोल्डर वर्कची स्थिती त्यांनी जाणून घेतली. उर्वरित कामात कोणतीही दिरंगाई होऊ नये आणि नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुविधा मिळावी, यासाठी उर्वरित सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना आ.मुनगंटीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मूल-चंद्रपूर महामार्ग सुरक्षित, सुस्थितीत आणि खड्डेमुक्त व्हावा, यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय स्तरापासून राष्ट्रीय महामार्ग विभागापर्यंत सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे दुरुस्तीच्या कामाला गती मिळाली आहे. मोठ्या प्रमाणातील खड्डे बुजविण्याचे काम पूर्णत्वास आले असून उर्वरित पॅचेस व शोल्डर वर्कही लवकरच पूर्ण होणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेत आ. मुनगंटीवार यांनी संबंधित यंत्रणेला कामाच्या गुणवत्तेसह वेळेचेही काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

NH-930 दुरुस्ती व कायमस्वरूपी मजबुतीकरणाबाबत विभागाची महत्त्वाची माहिती

अधीक्षक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग मंडळ, नागपूर यांनी दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या पत्रानुसार, मूल–चंद्रपूर NH-930 वरील खड्डे, पृष्ठभाग दुरुस्ती व देखभालीचे काम सुरू आहे. ३९.६७४ किमी रस्त्याच्या कायमस्वरूपी मजबुतीकरणासाठी DBM व BC स्तरावरील प्रस्ताव मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. तसेच ३५.२८४ किमी लांबीच्या भागाच्या मजबुतीकरणासाठी ₹५६.०९ कोटींचा सविस्तर अंदाजपत्रक मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page