Saturday, August 22, 2026
spot_img
HomeYojnaइतर मागासवर्गीय मुलां / मुलींच्या शासकिय वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

इतर मागासवर्गीय मुलां / मुलींच्या शासकिय वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

इतर मागासवर्गीय मुलां / मुलींच्या शासकिय वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

Ø अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2026 पर्यंत

            चंद्रपूर( जीमाका): इतर मागासवर्गीय प्रवर्गातील मुले / मुलींना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी वसतीगृह सुरू करण्यात आले आहे. सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी पदवी व पदव्यूत्तर पदवी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर विद्यार्थी 12 वी किमान 60 टक्क्यांनी उत्तीर्ण असावा.
प्रवेशाचे निकष व नियमावली खालीलप्रमाणे आहे : 1. विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org/ या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज भरावा. 2. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. 3. विद्यार्थी हा चंद्रपूर येथील स्थानिक रहिवासी नसावा. 4. पदवी किंवा पदव्यूत्तर पदवी प्रथम वर्षातच शिक्षण घेणारा असावा.5. वार्षिक उत्पन्न 2.50 लाखाचे आत असावे. 6. विद्यार्थ्यांचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. 7. व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमीलेअर तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. 8. सर्व विद्यार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला, बोनाफाईड ओरीजनल जोडावे. 9. ऑनलाईन अर्ज करण्याची शेटवची तारीख 31 ऑगस्ट 2026 असल्याने त्यापूर्वी विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत. 10. ऑनलाईन अर्ज अचूक भरल्यानंतर सर्व कागदपत्रे जोडून, सदर अर्ज इतर मागासवर्गीय मुला/मुलींच्या शासकीय वसतीगृहात जमा करावा, असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. सचिन मडावी यांनी कळविले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page