Friday, September 11, 2026
spot_img
HomeEducation*कॉन्व्हेंट शिक्षकांचे धरणे आंदोलन संपन्न*

*कॉन्व्हेंट शिक्षकांचे धरणे आंदोलन संपन्न*

*कॉन्व्हेंट शिक्षकांचे धरणे आंदोलन संपन्न*

*Jyotsna Wankhede*:
दिनांक 4 सप्टेंबर 2026 ला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, चंद्रपूर तर्फे जिल्हा परिषद समोर दुपारी 3  ते 5 या वेळात कॉन्व्हेंट शिक्षकांचे धरणे आंदोलन संपन्न झाले.
 महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट  विभागातर्फे आयोजित धरणे आंदोलनात ब्रह्मपुरी, बल्लारशा, घुगुस तथा चंद्रपूर जिल्ह्यातील कॉन्व्हेंट शिक्षकांनी उपस्थिती दर्शविली.
प्रहार संघटनेचे पदाधिकारी अमित यादव,महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर तर्फे पदाधिकारी श्री शुभम जेऊरकर आई फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ता श्री अमोल मांढरे ,जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या संस्थेतर्फे संपूर्ण समर्थन लिखित स्वरूपात दिले व त्यांनी आपल्या कार्यकर्त्यासह उपस्थिती दर्शविलि.
 संघटनेने आतापर्यंत कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षकांच्या न्याय मागण्यासाठी अनेकदा प्रशासनाला निवेदने, मोर्चे, भजन आंदोलन, मुंडन आंदोलन करून आपल्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी प्रयत्न केला.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट विभागाचे अध्यक्ष विवेक आंबेकर, सचिव संजय उपाध्ये, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष दिलीप मेकेलवार ,प्रवीण कडू, सतीश कणकम, बबिता नागदेवते, उपमा चौधरी, श्रद्धा मोहतो, श्रावण निषाद यांच्या शिष्टमंडळांनी जिल्हा परिषद ॲडिशनल मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नूतन सावंत, शिक्षणाधिकारी माध्यमिक राजेश पातळे यांच्या माध्यमातून मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व मा. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना निवेदन दिले.
 कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षकांच्या प्रमुख मागण्या.
शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शालेय कायदा MEPS 1977 व नियमावली 1981 नुसार पूर्ण वेतन, नियुक्तीपत्र, सर्विस बुकची प्रत,CL,EL, मा. जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या सुट्ट्या, कामाचे तास, महिलांना प्रसूती पूर्व वेतनासह रजा, वेतनातून भविष्य निर्वाह निधीची नियमानुसार कपात, ग्रॅच्युईटी निधी, तथा इतर नियमात निर्देशित लाभ  मिळावे व राज्यात सुरू असलेल्या सर्व कॉन्व्हेंट शाळांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्या आर्थिक व प्रशासकीय बाबीची माहिती जनतेला पाहण्याकरिता शालेय वेबसाईटवर टाकावी, दोशी संस्थाचालक व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. या मागण्यांचा समावेश होता.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page