मुदत संपूनही वाळू उत्खनन सुरूच! — ब्रह्मपुरीत अधिकारी झोपेत की संगनमतात?
|
*कायदे पायदळी तुडवले जात आहेत*
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, मुदत संपल्यानंतर उत्खनन करणे पूर्णतः बेकायदेशीर आहे. तरीही येथे उघडपने यंत्रे वापरून उत्खनन सुरू आहे, जे केवळ नियमानं निषिद्धच नव्हे, तर शासनाच्या महसुलावर थेट डल्ला आहे.
माहिती मिळूनही अधिकाऱ्यांनी कारवाई न करणे म्हणजे कर्तव्यातील गंभीर कसूर, तसेच अवैध उत्खननाला अप्रत्यक्ष पाठबळ देणे होय.
|
*प्रश्न उपस्थित होतो:*
> एक कर्तव्यदक्ष अधिकारी अशी गंभीर माहिती मिळाल्यावर काय करतो?
> तो तत्काळ कारवाई करतो, तपासणी पथक पाठवतो, यंत्रे जप्त करतो.
> पण येथे अधिकारी मूकदर्शक का आहेत? कर्तव्यचुकारपणा, दुर्लक्ष की संगनमत?
|
|
*नागरिकांच्या मागण्या*
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी.
मुदत संपूनही उत्खनन करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा.
कर्तव्यचुकार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.
महसुलाचे नुकसान भरून घेण्यासाठी दंडात्मक कारवाई करावी.
हा प्रकार फक्त वाळू चोरी नाही, तर शासनाच्या तिजोरीवर आणि कायद्यावर होणारा हल्ला आहे.
|








