*अवैध जनावर वाहतुकीविरोधात पोलीस स्टेशन पडोली ची कार्यवाही….*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
दिनांक 15/09/2026 रोजी पोलीस स्टेशन पडोली हद्दीत, एक पिकअप वाहनातून अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करताना कारवाई केली. यामध्ये एकूण 03 नग गोवंशीय जनावरे आढळून आले.
*सदर कारवाईदरम्यान एक पिकअप वाहने व 03 गोवंशीय जनावरे असा *अंदाजे ₹5,55,000/- किंमतीचा* मुद्देमाल जप्त करण्यात आला.*
*सदर प्रकरणात खालील आरोपींचा समावेश आहे –*
1) बोलेरो पिकअप चालक अनिमुद्दीन गुलबुद्दीन शेख वय 24 वर्षे, व्यवसाय डायव्हर रा. शिवनगर वॉर्ड घुघूस ता .जि. चंद्रपुर
सदर आरोपींविरुद्ध कलम 11(1),(d) प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंध अधिनियम 1960, सहकलम 5, 5(A), 5(B), 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 (सुधारित 2015) सहकलम 119 म.पो. का. तसेच, गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.