Thursday, July 30, 2026
spot_img
Homeबल्लारपूरमुख्य अतिथी तहसीलदार रेनुका कोकाटे यांच्या उपस्थितीत के.जी.एन. पब्लिक स्कूलचा वार्षिक सोहळा...

मुख्य अतिथी तहसीलदार रेनुका कोकाटे यांच्या उपस्थितीत के.जी.एन. पब्लिक स्कूलचा वार्षिक सोहळा उत्साहात संपन्न

मुख्य अतिथी तहसीलदार रेनुका कोकाटे यांच्या उपस्थितीत के.जी.एन. पब्लिक स्कूलचा वार्षिक सोहळा उत्साहात संपन्न

ज्योत्स्ना वानखेडे:
बल्लारपूर येथील के.जी.एन. पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक सोहळा दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी गोंडराजे बल्लालशाह, बल्लारपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाला मुख्य अतिथी तहसीलदार सौ. रेनुका कोकाटे यांच्या उपस्थितीने विशेष शोभा लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. शेख महमूद होते, तर अध्यक्ष सौ. यास्मीन शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शाळेच्या प्राचार्या सौ. स्वाती सुहास वाघमारे तसेच उपप्राचार्या कु. सीमा माकडे उपस्थित होत्या. कार्यक्रमास नगर परिषद उपाध्यक्ष श्री देवेंद्र आर्या, समाजसेविका सौ. अफसाना सय्यद, नगरसेवक श्री मोहित डंगोरे, ज्येष्ठ तालुका प्रतिनिधी श्री. वसंत खेडेकर व गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य श्री दीपक धोपटे यांनी उपस्थिती दर्शविली.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मनमोहक नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांच्या कला, आत्मविश्वास व सादरीकरणाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
प्राचार्या सौ. स्वाती वाघमारे यांनी आपल्या भाषणात शाळेतील शैक्षणिक, सांस्कृतिक व सहअभ्यासक्रम उपक्रमांची माहिती दिली. संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. शेख महमूद यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगत शिस्त व परिश्रमाचा संदेश दिला.
मुख्य अतिथी सौ. रेनुका कोकाटे यांनी प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने व ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन करत शाळेच्या कार्याचे भरभरून कौतुक केले.
अतिथींच्या उपस्थितीत व विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे हा वार्षिक सोहळा स्मरणीय ठरला.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page