Sunday, May 3, 2026
Homeबल्लारपूरबल्लारपूर शहरातील लाकडी स्टॉक यार्ड संदर्भात पेपरमील व वनविभाग प्रशासनासोबत बैठकीची मागणी...
spot_img

बल्लारपूर शहरातील लाकडी स्टॉक यार्ड संदर्भात पेपरमील व वनविभाग प्रशासनासोबत बैठकीची मागणी -आम आदमी पार्टी बल्लारपूर

बल्लारपूर शहरातील लाकडी स्टॉक यार्ड संदर्भात पेपरमील व वनविभाग प्रशासनासोबत बैठकीची मागणी -आम आदमी पार्टी बल्लारपूर 

श्रेयश वानखेडे:
सोमवार दि.11 मार्च 2024 रोजी आम आदमी पार्टी तर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले. बल्लारपूर शहरात काही काळापासून वन्यजीवांचा हैदोस वाढलेला आहे. वन्य जीवांमुळे काहि नागरिकांना जीव देखील गमवावे लागले. शहरात पेपर मील चे लाकडाचे स्टॉक यार्ड वन्य प्राण्यांना लपून बसण्यास जागा बनली आहे व यामुळेच वन्य जीव शहरात प्रवेश करतात अशी माहिती शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी दिली व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन पेपर मील व वन विभाग प्रशासनासोबत बैठकची मागणी केली. व कोणत्या नियमाने शहरात लाकडाचे स्टॉक यार्ड बनवले गेले ? कळमना येथे घडलेल्या अपघाता सारखे अपघात  बल्लारपूर शहरातील लाकड़ी स्टॉक यार्डमध्ये झाले तर त्याची जबाबदारी कोणाची?  असा प्रश्न देखील उपस्थित केला. यावेळेस शाहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलावर, उपाध्यक्ष अफजल अली, सचिव ज्योतिताई बाबरे, प्रवक्ता आसिफ शेख, युथ अध्यक्ष सागर कांबळे, महिला अध्यक्षा किरण खन्ना, सलमा सिद्दिकी, मनीषा अकोले, शिरीन सिद्दिकी, रेखा भोगे, गणेश अकोले, प्रणय नगराळे इत्यादी उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page