बल्लारपुरात भीषण पाणी टंचाई, 80 वर्षीय इसमाचा हातपंप वापरताना मृत्यू, दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाईची राजू झोडे यांची मागणी

बल्लारपुर शहरातील अनेक वार्डात 26 एप्रिल पासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून याकडे बल्लारपुर नगरपरिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण यांच्यामुळे संतोषी माता वार्डात राहणाऱ्या देवचंद फतूजी ढोरे वय 80 (कालच वाढदिवस & मृत्यु एकाच दिवसी ) रा. संतोषी माता वार्ड बल्लारपुर नामक इसमाचा हातपंप वापरताना मृत्यू झाला. ही अतिशय गंभीर बाब असून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, बल्लारपुर नगरपरिषदचे मुख्याधिकारी, तहसीलदार, महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे.








