Thursday, July 30, 2026
spot_img
Homeबल्लारपूरजनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन

श्रेयश वानखेडे:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बी. बी. भगत मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे एम. डी. टोंगे (माजी मुख्याध्यापक), यू. के. रांगणकर सर यांची मंचावर उपस्थिती होती.
प्रथमत: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
वैष्णव जन तो तेने कहिये,
रघुपती राघव राजाराम, पतित पावन सिताराम हे भजन गायन करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले.
 प्रमुख पाहुणे एम. डी. टोंगे (माजी मुख्याध्यापक) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र मिळवून देण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती सांगितली.
यु. के. रांगणकर सर यांनी सांगितले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी असहकार, चले जाव आंदोलनातून इंग्रजांना जेरीस आणले व त्यांना देश सोडण्यास भाग पाडले.
अध्यक्षीय भाषण बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी केले.
तत्पूर्वी सकाळी शालेय परिपाठाचे वेळेस दोन मिनिटे मौन ठेवून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. के. वानखेडे, संचालन व आभार प्रदर्शन आर. बी. अलाम यांनी केले.
कार्यक्रमात एस. एम. चव्हाण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वाल्मीक खोंडे, इंद्रभान अडबाले विद्यार्थी गण उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page