Tuesday, January 20, 2026
HomeSanghtanaऑटोरिक्षा चालक मालक संघटनेने आभार मानले
spot_img

ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेने आभार मानले

ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेने आभार मानले

मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने रु. ८३ लाख ९३ हजार पाण्‍याची टाकी  व बस स्‍टॅंड येथे टिनाचे शेड मंजुर

Shreyash Wankhede:

महाराष्‍ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे चंद्रपूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍याकडे प्रधान डाकघर, पाण्‍याची टाकी स्‍टॅंड व मुख्‍य बस स्‍टॅंड ऑटो‍रिक्षा स्‍टॅंडवर ऑटो उभे करण्‍याकरिता स्‍थायी स्‍वरुपाचे स्‍टॅंड ऑटोरिक्षा चालकांना उपलब्‍ध करुन देण्‍यात यावे, अशी मागणी मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍याकडे पत्रव्‍यवहार करुन करण्‍यात आली. त्‍यामुळे मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांनी महानगरपालिका आयुक्‍त यांना सुचना करुन पाण्‍याची टाकी व बस स्‍टॅंड येथे त्‍वरित टिनाचे शेड उपलब्‍ध करुन देण्‍यात यावे असे निर्देश दिले.

त्‍यामुळे नगरोत्‍थान निधी अंतर्गत रु. ८३ लाख ९३ हजार निधी उपलब्‍ध करुन दिला आहे.  त्‍याबद्दल महाराष्‍ट्र ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेचे संस्‍थापक अध्‍यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्‍हाध्‍यक्ष मधुकर राऊत, जिल्‍हा सचिव सुनिल धंदरे, जिल्‍हा संघटन प्रमुख विनोद चन्‍ने, कुंदन रायपुरे, दिलीप ढवळे, परशुराम तुराडे, अंकुश  कौराते, किशोर वाटेकर, वासुदेव कुबडे, महेश ढेकरे, जनार्धन गुंजेकर, अरविंद चौरे, राकेश पवार, बबन टोंगे, अविनाश उकेकर, रमेश वझे, बंडू भगत तसेच चंद्रपूर शहरातील सर्व ऑटोरिक्षा चालकांनी मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page