क्रांतीज्योती सावित्रीबाई शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2023 ची माहिती देण्याबाबत शिक्षण विभागाची टाळाटाळ
प्रथम अपिलीय अधिकारी यांच्या आदेशानंतरही माहिती अप्राप्त
श्री. राजू किसनराव वानखेडे यांनी दिनांक: 11/09/2023 रोजी माहिती अधिकार कायदा 2005 अन्वये, क्रांतीज्योती सावित्रीबाई शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2023 माध्यमिक संवर्ग बाबत माहिती माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे अर्ज सादर केला होता.
त्यामध्ये 1) आवेदन पत्र सादर केल्यानंतर मुलाखत घेऊन गुणांकन तक्ता.( सर्व आवेदन धारक), 2) अलग- अलग खोलीत मुलाखत (उदा. रूम 1, रूम 2, रूम 3) घेणाऱ्या व्यक्तींची यादी नाव, पद, मोबाईल नंबर, 3) निवड समितीची यादी (नाव, पद, मोबाईल नंबर) आधी माहिती नोंदणीकृत टपालाद्वारे मागितली होती.
माहिती विहित मुदतीचे आत दिलीच नसल्यामुळे त्या अनुषंगाने, मान. शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद, चंद्रपूर यांच्याकडे प्रथम अपीलपत्र दिनांक: 06/11/2023 ला दाखल करण्यात आले.
प्रथम अपीलपत्रावर दिनांक: 04/ 12/ 2023 रोजी मान. माध्यमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी सुनावणी घेतली. व त्याअनुषंगाने क्रमांक/शिक्षणमाध्य/ अपीसुनाआ/ 24/ 2023, दिनांक:07/12/ 2023 रोजी आदेश पारित केला. त्या आदेशात स्पष्टपणे नमूद आहे की, ह्या आदेशाच्या दिनांकपासून 15 दिवसापर्यंत अपीलार्थी यास माहिती अधिकारी यांनी, त्यांचे कडे उपलब्ध असलेली संपूर्ण माहिती विनामूल्य पंजीबद्द डाकेद्वारे पुरवण्यात यावी व केलेल्या कारवाईचा अहवाल माध्यमिक शिक्षण विभाग या कार्यालयास विना विलंब सादर करावा. ” होणाऱ्या विलंबनास सर्वस्वी जबाबदार संबंधित मानिव माहिती अधिकारी राहील, याची नोंद घ्यावी.”वरील आदेशाच्या दिनांकपासून आजपर्यंत अपीलार्थी श्री. राजू किसनराव वानखेडे यांना कोणत्याच प्रकारची माहिती मिळाली नसल्याचे निदर्शनात आलेले आहे.