श्रेयश वानखेडे:
दिनांक 03/01/2024 ला महात्मा ज्योतिबा फुले(हिंदी, उर्दू,तेलुगू) विद्यालय, बल्लारपूर येथे थोर समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. मकसूद यांच्या मार्गदर्शनाखाली विध्यार्थ्यांची मोठी प्रभातफेरी काढण्यात आली. ही प्रभातफेरी फुले भवन येथून सावित्रीबाई फुले सभागृह येथे नेण्यात आली. तिथे सावित्रीबाईच्या प्रतिमेला माल्यार्पण करून, परत ती फुले भवन येथे आणण्यात आली, सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारीत विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांकडून साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष ऍड जयंत साळवे, संस्था सचिव सुभाष ताजने तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री. मकसूद अहमद प्रामुख्याने उपस्थित होते, तर प्रमुख वक्ते म्हणून गुरूनानक विज्ञान महाविद्यालयाच्या प्राध्यापिका श्रीमती दुधे मॅडम उपस्थित होत्या. शाळेचे पर्यवेक्षक श्री. प्रकाश सर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले, तर हिंदी, उर्दू,तेलुगू या तिन्ही माध्यमातील पाळी प्रमुख आणि शिक्षकांनी तसेच शिक्षककेत्तर कर्मचारी आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमाचे संचालन श्रीमती रजनी केशकर मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती हेमलता मॅडमने केले. अशी माहिती श्री. रवी अनसुरी सर यांनी दिली.