Tuesday, August 4, 2026
spot_img
Homeबल्लारपूरकला-वाणिज्य महिला महाविद्यालयात इतिहास विषयांचे महात्मा फुले महाविद्यालयातील प्रा. डॉ. किशोर चौरे...

कला-वाणिज्य महिला महाविद्यालयात इतिहास विषयांचे महात्मा फुले महाविद्यालयातील प्रा. डॉ. किशोर चौरे यांचे गेस्ट लेक्चर

कला-वाणिज्य महिला महाविद्यालयात इतिहास विषयांचे महात्मा फुले महाविद्यालयातील प्रा. डॉ. किशोर चौरे यांचे गेस्ट लेक्चर

श्रेयश वानखेडे:
बल्लारपूर शहरातील स्थानिक कला-वाणिज्य महिला महाविद्यालय बल्लारपूर येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख डॉ. किशोर चौरे यांचे गेस्ट लेक्चर(अतिथी मार्गदर्शन) म्हणून मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम कला-वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र केवट यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रमोद घ्यार (इतिहास विभाग प्रमुख) यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. प्रमोद घ्यार, डॉ. किशोर चौरे, इतिहास विभाग प्रमुख, प्रा. दिपक भगत, राज्यशास्त्र विभाग यांची विचार पिठावर उपस्थिती होती. डॉ. प्रमोद घ्यार यांनी प्रमुख  अतिथीचा विद्यार्थ्यांना परीचय करून दिला व प्रस्तावीक केले. यायावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. किशोर चौरे सर म्हणालेत की, ” विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञाना सोबतच चर्चात्मक अभ्यासावर भर द्यावा, नवनवीन कौशल्य व तंत्रचा वापर करावा तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यास करतांना केवळ परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अभ्यास न करता ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा.  तसेच इतिहास विषय रटाळ नसून स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे,तसेच नुकतीच पार पडलेल्या सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने स्त्री शिक्षणामुळे महिलांनी मोठया प्रमाणावर प्रगती केली असून वर्तमान स्थितीत महिलांनी देशाच्या राष्ट्रपती म्हणून सर्वोच्च स्थान प्राप्त केले. ” यावेळी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page