Wednesday, January 14, 2026
HomeCrimeलाचखोर ग्रामसेवक पुरुषोत्तम यशवंत टेंभुर्ने अडकला लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.
spot_img

लाचखोर ग्रामसेवक पुरुषोत्तम यशवंत टेंभुर्ने अडकला लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.

लाचखोर ग्रामसेवक पुरुषोत्तम यशवंत टेंभुर्ने अडकला लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.

श्रेयश वानखेडे:

ग्रामपंचायत कार्यालय झिलबोडी येथील पुरुषोत्तम यशवंत टेंभुर्ने, वय ४८ वर्ष, व्यवसाय- नौकरी, पद- ग्रामसेवक (सचिव) ग्रामपंचायत कार्यालय झिलबोडी ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर यांचे विरुध्द १५,०००/रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती १०,०००/रुपये स्विकारल्या संबंधाने अन्टी करप्शन ब्युरो चंद्रपूर यांचे पथकाने आज रोजी कार्यवाही केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तकारदार हे मौजा झिलबोडी ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथील रहीवासी असुन ठेकेदारीचा व्यवसाय करतो. तक्रारदार यांनी जिल्हा परीषद चंद्रपूर अंतर्गत १५ व्या वित्त आयोगामधुन सन २०२१ ते २०२२ च्या दरम्यान ग्रामपंचायत झिलबोडी येथील जिल्हा परीषद प्राथमीक शाळेचे शौचालय, मुतारी घर बांधकाम ईत्यादी कामे व मौजा परसोडी जानी येथील अंगणवाडीचे शौचालय, मुतारी घर बांधकाम व किचन शेड बांधकाम ईत्यादी कामे केली होती. सदर कामाचे एकुण ३,९०,०००/रुपये तक्रारदार यांना ग्रामपंचायत कार्यालय झिलबोडी येथील ग्रामसेवक यांनी तकारदार यांना चेकद्वारे देण्यात आले होते. तक्रारदार यांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून ग्रामपंचायत कार्यालय झिलबोडी येथील ग्ग्रामसेवक पुरुषोत्तम डेंभुर्णे यांनी १५,०००/रुपयाची मागणी केली होती. परंतु तकारदार यांना गैरअर्जदार यांस लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांना भेटून तकार दिली.

प्राप्त तकारीवरुन आज दिनांक १६/०२/२०२४ रोजी पडताळणी कार्यवाही करण्यात आली. पडताळणी कार्यवाही दरम्यान लाचरक्कमेची मागणी स्पष्ट झाल्याने व तळजोडीअंती १०,०००/रुपये स्विकारण्याची तयारी दर्शवीली असल्याने आज दिनांक १६/०२/२०२४ रोजी करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान गैरअर्जदार यांनी तक्रारदाराकडे १५,०००/रु. ची मागणी करुन तडजोडीअंती १००००/रु. पुरुषोत्तम टेंभुर्णे यांनी पंचासमक्ष स्वता लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले असुन पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान सदरची कार्यवाही राहुल माकणीकर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतीबंध विभाग नागपूर, संजय पुरंदरे अपर पोलीस अधीक्षक, तसेच श्रीमती मंजुषा भोसले पोलीस उपअधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, नापोशि संदेश वाघमारे, पो.कॉ. वैभव गाडगे, राकेश जांभुळकर, सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर व पो.कॉ. विनायक वंजारी मो.प.वि. चंद्रपूर यांनी यशस्वी पार पाडली आहे. हॅश व्हॅल्यु घेण्यात आलेली आहे. तरी सर्व नागरीकांना त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ राहुल माकणीकर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतीबंध विभाग नागपूर, संजय पुरंदरे अपर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि. नागपूर, लाचलुचपत प्रतिबंध विभाग कार्यालय नागपूर ०७१२-२५६१५२०, श्रीमती मंजुषा भोसले पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वि. चंद्रपूर-९३२२२५३३७२, प्रशांत पाटील पोलीस निरीक्षक ला.प्र.वि. चंद्रपूर-९१३०५५६१६१, जितेंद्र गुरनुले पोलीस निरीक्षक ला.प्र.वि. चंद्रपूर-८८८८८५७१८४, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०७१७२-२५०२५१, टोल फि क्रमांक १०६४ किंवा Website: www.acbmaharashtra.gov.in येथे तात्काळ संपर्क करण्याचे आव्हान जितेन्द्र गुरनुले पोलीस निरीक्षक अन्टी करप्शन ब्यूरो चंद्रपूर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page