बिबट्याच्या घरात घुसून वार, परिसरात भीतीचे वातावरण

श्रेयश वानखेडे:
१७ फेब्रुवारी रोजी बिबट्याने घरात घुसून एका व्यक्ती ला जखमी केल्याची घटना शहरात घडली.
माहितीनुसार शहरातील दिनदयाळ वार्ड मध्ये रात्री १०.३० वाजता च्या सुमारास बिबट्याने सोमनाथ जयस्वाल, वय ५५ वर्ष नामक व्यक्ती ला घरात घुसून जखमी केल्याची घटना घडली. दिनदयाळ वार्ड, पेपर मिल न्यू कॉलनी बांबू डेपो येथे बिबट्याचा धुमाकूळ घातला असून मागील दिवसात एक महिला वर सुध्दा वार करण्याचा प्रयत्न केला होता. त्या महिलेने बिबट्या ला हाकलून लावले होते. दिनांक: १७/०२/२०२४ च्या घटनेत बिबट्याने सोमनाथ जयस्वाल यांचा वर हल्ला करताच जोराने किंकाळी दिल्याने बिबट्या तेथून पसार झाला. सोमनाथ यांना बिबट्याने त्यांच्या हाताला खोरबळले. त्यामुळे दिनदयाळ वार्ड मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या विषयी नरेश भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, त्या परिसरात पेट्रोलिंग सुरू असून ती बिबट मादी असून तिला एक बछडा आहे.