श्रेयश वानखेडे:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त दिनांक: 19/02/2024 रोजी वैशाली नगर, उत्तर नागपुर येथे डॉ. प्रविणभाई तोगडीया यांच्या आदेशाने हिंदू केंद्र सुरु करण्यात आले. याप्रसंगी किशोर डिकोंडवार,आ.हि.प विदर्भ प्रांताचे महामंत्री,
नदुं गट्टूवार प्रांत संपर्क प्रमुख रा. बजरंग दल, कार्यकर्त्यांना संबोधीत करताना सांगितले कि,
छत्रपती शिवाजी महाराज एक योद्धा राजा होते आणि ते त्यांच्या शौर्य, रणनीती आणि प्रशासकीय कौशल्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी नेहमी स्वराज्य आणि हिंदू वारसा यावर लक्ष केंद्रित केले.
मुघलांच्या दहशतीने त्रस्त असलेल्या हिंदूंना एकत्र आणण्याचे आणि हिंदूंचा भगवा पताका संपूर्ण भारतभर शौर्याने फडकविण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले आणि त्यांच्या आदर्शावर चालण्याचे काम आज आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल यांच्या माध्यमाने सुरू आहे. डॉ. प्रविणभाई तोगडिया यांचे मार्गदर्शनात देशात काम जोरात सुरू आहे.
शिवाजी महाराज जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.उत्तर नागपूर विधानसभा कार्याध्यक्ष निरज कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हर्षल धर्माळे नागपुर महानगर अध्यक्ष,गोविंदा शेट्टी माजी जिल्हा महामंत्री, राहुल वाघ,हर्ष चौधरी,रोहित कैथाई,गुड्डू भगत,परितोस लाउतरे, अजय मोंदेकर,विनोद धार्मिक,राहुल बोकडे,अनिल सहारे, मनोज कालकर, विनय आतकर, राकेश डाखोरे, सचिन सदावर्ते, रवी भिवापूरकर आदी पदाधिकारी बजरंगी उपस्थित होते.