Sunday, January 18, 2026
HomeEducationसुशी दाबगावं शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा
spot_img

सुशी दाबगावं शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा

सुशी दाबगावं शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा

रात्रीच उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात भरती

काही दिवसांपूर्वीच एका विद्यार्थिनीचा मृत्यू

शाळेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात राजू झोडे यांची मागणी

चंद्रपूर जिल्ह्याच्या मुल तालुक्यातील सुशी दाबगावं आश्रम शाळेतील काही  विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असल्याची माहिती असून  शनिवारी रात्रीच मुलांना त्रास सुरू झाल्यानं त्यांना रात्रीच भरती ठेवण्यात आल्याने मोठी धास्ती विद्यार्थी व पालकांत निर्माण झालेली आहे. सद्या प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत असून विषबाधा नसल्याचे बोलले जात आहे.
काय होती घटना
चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यातील  सुशी येथे जिजामाता प्राथमिक आश्रम शाळा आहे.  या शाळेमध्ये इयता एक ते सातवी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात.  शनिवारी रात्री या सर्व मुलांनी जेवण अगोदर फळे खाऊन जेवण केले होते. दरम्यान शनिवारी (24 ऑगस्ट) रात्रीच्या सुमारास यातील काही विद्यार्थ्यांना रात्रीच पोटात दुखु लागल्याने या चारही विदयार्थ्यांना उपचाराकरिता  मुल ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.  मात्र प्रकृती बघून डॉक्टरांनी भरती ठेवायला सांगितले.
         सद्या शाळेतील गैरसोयीचे अनेक प्रकार उघडकीस येत असून विद्यार्थी व पालकांत आरोग्याच्या बाबतीत मोठी धास्ती निर्माण  आहे.  काही दिवसापूर्वीच एका विद्यार्थिनीचा नाहक मृत्यूची घटना ताजी असताना मुलांना आरोग्याची समस्या निर्माण झाल्याने नाना विध प्रश्न निर्माण झालेले असून विद्यार्थ्यांना अन्नांतून विषबाधा तर झाली नसावी अशी शंका व्यक्त केल्या जात आहे.
   जिजामाता आश्रम शाळा सुशी च्या संध्याताई गुरूनूले या संस्थापिका व सर्वेसर्वा आहेत त्या भाजपाच्या जिल्हा अध्यक्षा  व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहिल्या असून जिल्ह्याचे पालकमंत्री सुधिभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रमुख कार्यकर्त्या आहेत त्यामुळे सदर शाळेत अनेक घटना घडत असतानाही काहीच कार्यवाही होत नसल्याने कोठ तरी पाणी मुरत आहे. तरी सबंधित शाळेची उचस्तरिय  चौकशी करण्यात यावी अशी मागणी उलगुलान संघटनाचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे.
         सदर घटना अतिशय गंभीर असून घटनेची उचस्तरिय चौकशी प्रशासनाने करावी अशी मागणी उलगुलान संघटनाचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे.
          शनिवारी विद्यार्थ्यांनी खाल्लेल्या खीचडीचे अन्नाचे नमुने जमा करून तपासणीसाठी पाठवण्यात यावे व तपासणीचा अहवाल आल्यानंतर शाळा संचालक व पदाधिकारी यांचेवर दोषी आढळल्यास कारवाई करावी अशी मागणी सुद्धा करण्यात येत आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page