Thursday, January 22, 2026
HomeYojnaसंजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न
spot_img

संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न

संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न

251 प्रकरणांना मंजुरी

श्रेयश  वानखेडे:
संजय गांधी निराधार अनुदान योजनेची  बैठक दि. 26 फेब्रुवारी 2024 रोजी स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालय, बल्लारपूर येथील सभागृहात संपन्न झाली. यावेळी सदर योजनेतील सुमारे 251लाभार्थ्यांची प्रकरण मंजूर करण्यात आली. त्यात अपंग, निराधार, विधवा, परित्यगता, अविवाहित, दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्ण, वृद्ध आदी प्रवर्गातील लाभार्थ्यांचा समावेश आहे. सदर लाभार्थ्यांना तात्काळ या योजनेचा लाभ मिळावा यासाठी पुढील कार्यवाही केली जात आहे. याप्रसंगी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष श्री समीर केने, सचिव नायब तहसीलदार महेंद्र फुलझले, अजय मल्लेलवार ,सदस्य सौ वैशालीताई जोशी श्री किशोर मोहुर्ले, श्री रमेश पिपरे,  श्री अनिल मोरे यांच्या तसेच इतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page