Wednesday, July 29, 2026
spot_img
HomeSanghtanaबल्लारपुरातील वाघ व बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा अन्यथा वनविभाग, वनमंत्र्यांना घेराव घालू:...

बल्लारपुरातील वाघ व बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा अन्यथा वनविभाग, वनमंत्र्यांना घेराव घालू: राजू झोडे यांचा इशारा

बल्लारपुरातील वाघ व बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा अन्यथा वनविभाग, वनमंत्र्यांना घेराव घालू: राजू झोडे यांचा इशारा

श्रेयश वानखेडे:
बल्लारपुरात मानव-वन्यजीव संघर्ष वाढत चालला असून बिबट्याच्या हल्ल्यात एक मुलगी जखमी झाली आहे, तर वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना 13 मार्च ला घडली.दरम्यान नरभक्षक वाघ व बिबट्याचा बंदोबस्त तात्काळ करा अन्यथा बल्लारपूर वनविभाग व वनमंत्र्यांना घेराव घालू असा इशारा उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी दिला आहे.
13 मार्चला रवींद्रनगर वार्डात राहणारे नामदेव आत्राम हे कारवा जंगलात लाकूड आणण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले. तर 13 मार्चला आफ्रिना शेख या 7 वर्षीय मुलीला बिबट्याने जखमी केले. तसेच विसापूर व लगतच्या परिसरात जनावरांना सुद्धा ठार करणयात आले. यामुळं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस वाघ व बिबट्याचे हल्ले वाढत असून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार मात्र मोठमोठे इव्हेंट घेण्यात मग्न आहेत. तर वनविभाग सुद्धा झोपेचे सोंग घेऊन असून मानव वन्यजीव संघर्षवर आळा घालावा, वाघ व बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अन्यथा वनविभाग व वनमंत्र्यांना घेराव घालू असा इशारा राजू झोडे, संजय सुर्यवंशी, तेजन पडधरीया , सचिन तोटावार, आशिष रणदिवे यांनी दिला आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page