Saturday, August 8, 2026
spot_img
HomePoliticalसंत गोरोबा कुंभार समाज सेवा समितीचे ना.सुधीर मुनगंटीवार यांना समर्थन

संत गोरोबा कुंभार समाज सेवा समितीचे ना.सुधीर मुनगंटीवार यांना समर्थन

संत गोरोबा कुंभार समाज सेवा समितीचे ना.सुधीर मुनगंटीवार यांना समर्थन

चंद्रपूर जिल्ह्यात मागील अनेक वर्षापासून ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात विकासाचा झंझावात सुरू आहे. समाजातील सर्वच घटकांच्या प्रगतीच्या दृष्टीने प्रवाहित होत असलेली विकासाची गंगा अखंड प्रवाहित रहावी , अशी भावना व्यक्त करीत चंद्रपूर येथील संत गोरोबा कुंभार समाज सेवा समितीद्वारे ना.श्री. सुधीर मुनगंटीवार समर्थन जाहिर करण्यात आले आहे.

चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व कुंभार बांधवांचे समर्थन पत्र समितीद्वारे श्री. सुधीर मुनगंटीवार यांना सोपविण्यात आले. समितीचे अध्यक्ष श्री. अशोक ताटकंटीवार, उपाध्यक्ष श्री. जगपाल खरे, सचिव श्री. अजय मार्कंडेवार, सहसचिव श्री. राकेश चात्रेशवार, कोषाध्यक्ष श्री. गजानन अमरोजवार, सदस्य सर्वश्री रविशंकर व्यवहारे, तानु खिरे, सुहास ताटकंटीवार, गणेश रामगुंडेवार, शरद मंचलवार, कैलाश पुराणकर, राजेश रामगुंडेवार, ऋषी चिरखरे, अनील चेरकुरवार आदींनी या समर्थनपत्रावर स्वाक्षरी करून पाठींबा आणि समर्थन जाहीर केले.

चंद्रपुर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार श्री. सुधीर मुनगंटीवार हे समाजात संस्कार घडवित आहेत. चांगले, विचार असलेल्या अशा नेतृत्वाची समाजाला गरज आहे. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्यारुपात चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राला महाराष्ट्रातील आघाडीचे नेतृत्व मिळाले आहे. समाजाच्या अडीअडचणी, समस्या सोडविण्यासाठी श्री. सुधीर मुनगंटीवार हे लोकसभेत हमखास विजयी होतील व समाजाच्या मागण्यांना न्याय देतील, असा विश्वास समाजाने समर्थन पत्रातून व्यक्त केला.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page