स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात इतिहास विभागाद्वारे महामानव,प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली, व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य बी. डी. चव्हाण, इतिहास विभागप्रमुख डॉ. किशोर चौरे, डॉ रोशन फुलकर, डॉ. पल्लवी जुनघरे ,वरीष्ठ लिपिक श्री. प्रकाश मेश्राम होते, मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले, या कार्यक्रमाला इतिहास विभागप्रमुख डॉ.किशोर चौरे मार्गदर्शन करतांना म्हणतात की,डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथप्रेमी, ग्रंथकार होते, त्यांनी समाजाला, राष्ट्राच्या विकासाला उपयोगी पडतील असे ग्रंथ निर्माण केले, म्हणून त्यांनी लिहिलेले ग्रंथ आपण वाचून ज्ञान आत्मसात करावे असे प्रतिपादन केले, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बी. चव्हाण अध्यक्षीय भाषणात म्हणतात की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणावर विश्वास होता,त्यांना जिथे ग्रंथ दिसायचे तिथे ते थांबायचे, जणू ग्रंथ हे त्यांचा श्वास होता,असे प्रतिपादन केले, या कार्यक्रमा प्रसंगी विद्यार्थ्यांनीही आपले विचार व्यक्त केले, प्रा. ललित गेडाम, डॉ. रोशन फुलकर, डॉ.किशोर चौरे, प्रा. स्वाती बोरकुटे यांनी भीम गीते गायली, काही प्राध्यापकांनी कविता सादर केल्या, कार्यक्रमाचे संचालन डॉ. रोशन फुलकर यांनी तर आभार डॉ. पल्लवी जुनघरे यांनी मानले, कार्यक्रमाला महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.