Monday, January 19, 2026
HomeJayantiजनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व...
spot_img

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती कार्यक्रम

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती कार्यक्रम

श्रेयश वानखेडे:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती कार्यक्रम दिनांक 14/04/ 2024 रोजी घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बी. बी. भगत मुख्याध्यापक तर प्रमुख पाहुणे एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक,  आर. के. वानखेडे, यु. के. रांगणकर यांची मंचावर उपस्थित होती.
प्रथमता: उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपली भाषणे दिली.
माजी मुख्याध्यापक एम. डी. टोंगे, आर. के. वानखेडे, यु. के. रांगणकर यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनपटावर  माहिती विशद केली.
शाळेचे मुख्याध्यापक बी. बी. भगत यांनी अध्यक्षस्थाना वरून  दोन्ही महापुरुषांबद्दल  मार्गदर्शनपर भाषण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. बी. अलाम, संचालन एस. एन. लोधे, तसेच आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वामन बोबडे, वाल्मीक खोंडे, जगदीश कांबळे, इंद्रभान अडबाले तसेच विद्यार्थीगण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page