Tuesday, August 25, 2026
spot_img
HomeCrimeबल्लारपूर येथील 'बादल हरणे' टोळीतील ३ गुन्हेगार चंद्रपूर जिल्ह्यातून १ वर्षासाठी हद्दपार!

बल्लारपूर येथील ‘बादल हरणे’ टोळीतील ३ गुन्हेगार चंद्रपूर जिल्ह्यातून १ वर्षासाठी हद्दपार!

बल्लारपूर येथील ‘बादल हरणे’ टोळीतील ३ गुन्हेगार चंद्रपूर जिल्ह्यातून १ वर्षासाठी हद्दपार!

सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चंद्रपूर पोलिसांची धडक कारवाई

ज्योत्स्ना वानखेडे:
चंद्रपूर जिल्हा हद्दीत वारंवार गुन्हे करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या बल्लारपूर येथील एका टोळीवर चंद्रपूर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. मा. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये मिळालेल्या विशेष अधिकारांचा वापर करून, या टोळीतील ३ सराईत गुन्हेगारांना चंद्रपूर जिल्हा हद्दीतून १ वर्षाकरीता हद्दपार (तडीपार) करण्याचे आदेश जारी केले आहेत.
 हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची नावे:
१. बादल वसंता हरणे (वय २२ वर्षे)– टोळी प्रमुख (रा. श्रीराम वार्ड, बल्लारपूर, जि. चंद्रपूर)
२. यासिन अहमद सिद्दीकी (वय २९ वर्षे) – साथीदार (रा. सुभाष वार्ड, बल्लारपूर, जि. चंद्रपूर)
३. योगेश शंकर येरोल (वय २६ वर्षे) – साथीदार (रा. रवींद्र वार्ड, बल्लारपूर, जि. चंद्रपूर)
 कारवाईचे कारण व पार्श्वभूमी:
या टोळीविरुद्ध एकत्रितपणे खून, दंगल घडवणे, शिवीगाळ करणे, आणि जीवे मारण्याची धमकी देणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. बेकायदेशीर मार्गाने आर्थिक प्राप्ती करण्यासाठी हे गुन्हे केले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. या टोळीकडे मोठे आर्थिक पाठबळ आणि गुन्हेगारी सदस्यांचे बळ असल्याने त्यांच्या मनात कायद्याचा कोणताही धाक उरला नव्हता.
यापूर्वी त्यांच्यावर करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाया त्यांच्या वर्तनात सुधारणा घडवून आणण्यास निष्फळ ठरल्या होत्या. त्यांच्या वाढत्या गुन्हेगारी हालचालींमुळे बल्लारपूर व परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही कडक कारवाई करण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व पथक:
सदर धडक कारवाई मा. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विपीन इंगळे यांनी केली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अभिषेक जंगमवार, उमेश जोगदंड तसेच पोलीस स्टेशन बल्लारपूर येथील डी.बी. (गुन्हे शोध) पथकाने मोलाची कामगिरी बजावली.
पोलीस प्रशासनाचे आवाहन:
चंद्रपूर जिल्हा पोलिसांकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य करावे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page