श्रेयश वानखेडे:
दिनांक 14एप्रिल 2024 रोजी महात्मा ज्योतिबा फुले हिंदी,उर्दू, तेलुगू विद्यालय, बल्लारपूर येथे महामानव , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पर्यवेक्षक श्रीमान प्रकाश नरसिंगोज, प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव श्रीमान सुभाष ताजने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून करण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन तथा प्रास्ताविक श्री अजयपाल सुर्यवंशी यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनावर संस्थेचे सचिव श्री सुभाष ताजने यांनी आपले मौलिक विचार मांडले. यावेळी शाळेतील सर्व पाळी प्रमुख, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणातून श्री. प्रकाश सर यांनी संविधानाचे संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ती प्रत्येकाने पार पाडण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार श्री. सलीम यांनी व्यक्त केले.