Wednesday, January 14, 2026
HomeJayantiक्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती अखिल कुणबी...
spot_img

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती अखिल कुणबी समाजाद्वारें साजरी

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती अखिल कुणबी समाजाद्वारें साजरी

 श्रेयश वानखेडे:
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती अखिल कुणबी समाज मंडळाचे कार्यालय, (हत्तीगोटा खंडाळा रोड) ब्रम्हपुरी येथे साजरी करण्यात आली.
        कार्यक्रमाची सुरवात महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून झाली, यावेळी महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन संघर्षावर प्रकाश टाकण्यात आले. यावेळी बरेच समाज बांधव उपस्थित होते.  संविधानाची प्रास्तवना वाचन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
 यावेळी उपस्थित असलेल्या समाज बांधवांनी राजकीय घडामोडीवर चर्चा केली. सर्वात मोठा समाज म्हणून आपल्या समाजाकडे पाहायला जातो मात्र प्रत्येक क्षेत्रात आपला समाज मागे असून भविष्यात समाजाला तारुण नेण्याकरिता राजकारणातून सामाजिक चळवळ उभी करावी लागेल व याकरिता आपला समाज राजकारणात सक्षम करावा लागेल, होणाऱ्या पुढील निवडणुकांमध्ये समाजाचे प्रतिनिधित्व वाढवण्यावर भर घालावी लागेल यावर साधक बाधक चर्चा करण्यात आली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page