Saturday, May 2, 2026
HomeChandrapurमहानगरातील नाले -नाली स्वच्छ करा, जिल्हाध्यक्ष पावडे यांचा पुढाकार
spot_img

महानगरातील नाले -नाली स्वच्छ करा, जिल्हाध्यक्ष पावडे यांचा पुढाकार

महानगरातील नाले -नाली स्वच्छ करा

महानगर भाजपाचे मनपाला निवेदन

जिल्हाध्यक्ष पावडे यांचा पुढाकार

येणाऱ्या पावसाळ्यात लोकांच्या घरात पाणी शिरू नये म्हणून महानगरातील सर्व नाल्यांचा गाळ उपसून ते स्वच्छ करा अशी मागणी भारतीय जनता पार्टी महानगर तर्फे आयुक्तांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांची उपस्थिती होती.

पावडे म्हणाले,चंद्रपूर शहर नदीच्या काठावर वसलेले शहर असून शहरातूनच नदी प्रवाहित होते.या नद्यांना जोडणारे अनेक छोटे मोठे नाले आहेत.या नाल्यांचे अवलोकन केल्यास ते गाळ न उपसल्याने उथळ झाले आहेत.महत्वाचे म्हणजे नगिनाबाग प्रभाग क्र.09 मध्ये असलेले मोठे नाले व नाल्या सर्वात जास्त त्रासदायक आहेत पावसाळया आधी सर्व नाले साफ करून देणे अत्यंत आवश्यक आहे. दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील पाऊस जास्त प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सदर परीसर नेहमी पावसाच्या पाण्याने भरलेला असतो त्यामुळे येथील नागरीकांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता जास्त असते. करीता पावसाळा लागण्या अगोदर, शहरातील मोठे नाले व नाल्यांची साफ सफाई मोहिम राबविने अत्यंत गरजेचे आहे, करीता विशेष साफ सफाई मोहिम लवकरात लवकर चालु करावी अशी मागणी त्यांनी केली.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page