*स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस स्टेशन रामनगर व पोलीस स्टेशन भद्रावती पोलिसांनी संयुक्त धाड मोहिमेत एका मोठ्या बेकायदेशीर वाळू/रेती वाहतूक रॅकेटचा पर्दाफाश*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
दोन वेगवेगळ्या वाहनांवर एकच नोंदणी क्रमांक (नंबर प्लेट) आणि एकाच ई-टीपी (eTP) चा वापर करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या टोळीवर ही धडक कारवाई करण्यात आली आहे.
*कारवाईचा संक्षिप्त तपशील*
*1)* कारवाईचे ठिकाण: नागपूर मार्ग, वाहतूक शाखा, चंद्रपूर जवळ (नाकाबंदी दरम्यान).
*2)* जप्त करण्यात आलेला एकूण मुद्देमाल: ₹ 81,10,000/- (81 लाख 10 हजार रुपये).
*जप्त वाहने व रेती:*
– टाटा 4830 टी.के. (16 चाकी): किंमत ₹ 45 लाख + 11 ब्रास रेती (किंमत ₹ 55 हजार).
– टाटा टिप्पर 3532 टी.के. / हायवा (12 चाकी): किंमत ₹ 35 लाख + 11 ब्रास रेती (किंमत ₹ 55 हजार).
*गुन्ह्याची हकीकत :-*
दिनांक 07 ऑगस्ट 2026 रोजी रात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना रामनगर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, मूल ते चंद्रपूर मार्गाने दोन वाहने एकाच नंबर प्लेटचा वापर करून अवैध वाळू वाहतूक करत आहेत.
या माहितीवरून पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक व पंचांसोबत नागपूर मार्गावर नाकाबंदी करण्यात आली.
*पहिली गाडी (12 चाकी हायवा):* रात्री 3.00 वाजताच्या सुमारास संशयास्पद वेगाने येणाऱ्या हायवा (MH-34-BZ-8114) ला थांबवण्याचा इशारा केला असता, चालकाने गाडी भरधाव वेगाने नागपूरच्या दिशेने पळवली. पोलिसांनी पाठलाग करून भद्रावती पोलिसांच्या मदतीने घोडपेठ येथे सदर गाडी पकडली.
*दुसरी गाडी (16 चाकी ट्रकमध्येही तोच नंबर):* रात्री 3.30 वाजताच्या सुमारास दुसरी 16 चाकी गाडी (MH-34-BZ-8114) देखील नाकाबंदीत थांबवण्यात आली.
दोन्ही गाड्यांची तपासणी केली असता, आश्चर्यकारकरित्या दोन्ही स्वतंत्र वाहनांवर एकच नंबर (MH-34-BZ-8114) लावलेला होता आणि दोन्ही गाड्यांमधील चालक एकाच ई-टीपी क्रमांकाचा (33198347) वापर करून रेतीची अवैध वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले.
*आरोपींची नावे*
1. *स्वप्निल सुरेश कबडे* (वय 37 वर्ष, रा. सावजी नगर, वर्धा) – चालक (16 चाकी)
2. *रामकेश राजेश केवट* (वय 20 वर्ष, रा. जि. सीधी, मध्य प्रदेश) – चालक (12 चाकी)
रोहन चाफले (रा. खांबाळा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) – वाहन मालक
*दाखल करण्यात आलेले गुन्हे*
आरोपींनी परस्परांशी संगनमत करून, शासनाची फसवणूक करण्याच्या व महसूल बुडवण्याच्या उद्देशाने बनावट ई-टीपी व नंबर प्लेटचा वापर केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन येथे खालील कायद्यांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे:
*भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३:* कलम 303(2), 318(4), 336(3), 3(5)
*महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६:* कलम 48(7), 48(8)
*खाण व खनिज (विकास व विनियमन) अधिनियम, १९५७:* कलम 4(1), 4(1-अ), पर्यावरण कायदा कलम 5, 15
पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री. आयुष नोपानी, माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब श्री. ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे, स्थागुशा चंद्रपूर, पोलीस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकुरके, ठाणेदार पो.स्टे. रामनगर यांच्या नेतृत्वात सपोनि विरेंद्र केदारे, पो.उपनिरि. सर्वेश बेलसरे, पो.हवा. विनोद यादव, पो.हवा. गणेश भोयर, पो.हवा. जितेंद्र आकारे, पो.हवा. अनुप आष्टुंकर, पो.हवा. गोपाल आरकुवर पो.अं. अजित शेंडे, पो.अं. प्रकाश मडावी, पो.अं. राजू चिताडे यांनी केली.