Saturday, April 18, 2026
Homeबल्लारपूरबल्लारपूर वनपरिक्षेत्रात जागतिक पर्यावरण दिन साजरा
spot_img

बल्लारपूर वनपरिक्षेत्रात जागतिक पर्यावरण दिन साजरा

बल्लारपूर वनपरिक्षेत्रात जागतिक पर्यावरण दिन साजरा

श्रेयश वानखेडे:
जागतिक समतोल राखण्यासाठी दरवर्षी पर्यावरण दीन साजरा करण्यात येतो. यंदा ही बल्लारपूर वनपरिक्षेत्रात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आले.
          ५ जुन रोजी  पर्यावरण दिनानिमित्त बल्हारशाह वनपरिक्षेत्रात सन  २०२४ चे पावसाळया करीता प्रस्तावित असलेले मिश्र रोपवन २०२४ कक्ष क्रमांक ४५१ मानोरा, मिश्र रोपवन २०२४ कक्ष क्रं. ४४६ उमरी व मिश्र रोपवन २०२४ कक्ष क्रमांक ५७८ विसापुर १ येथे वृक्षारोपन करुन पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला.
        मानोरा येथील मिश्र रोपवनात सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह नरेश भोवरे, संयुक्त वनव्यवस्थापन समिती मानोरा अध्यक्ष अमोल ढोंगे, सामाजिक कार्यकर्ता रमेश पिपरे यांचे शुभ हस्ते वृक्षारोपवन करुन पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील क्षेत्रीय वनकर्मचारी व कामावरील मजुर उपस्थीत होते. त्यानंतर उमरी येथील मिश्र रोपवन कक्ष क्रं. ४४६ येथे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह नरेश भोवरे, ग्राम पंचायत, उमरी पोदार सरपंच श्रीमती. लेणगुरे, संयुक्त वनव्यवस्थापन समिती उमरी तुकुम अध्यक्ष परचाके, उमरी पोतदार अध्यक्ष देवईकर व बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी यांनी वृक्ष लागवड करुन पर्यावरण दिवस साजरा केला. विसापुर येथे मिश्र रोपवनात ग्राम पंचायत, विसापुर सरपंच सौ. वर्षा कुळमेथे, क्षेत्र सहाय्यक बल्हारशाह कोमल घुगलोत, वनरक्षक कु. वर्षा पिपरे व सुधीर बोकडे यांनी यांनी वृक्ष लागवड करुन पर्यावरण दिवस साजरा केला. बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील मौजा कारवा, किन्ही व कळमणा मध्ये वनकर्मचारी यांनी वृक्ष लागवड करुन पर्यारण दिवस साजरा केला.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page