Sunday, January 18, 2026
Homeबल्लारपूरबोगस स्वाक्षरी प्रकरण अंगलट येणार बल्लारपुरातील शिक्षण क्षेत्रातील त्या वस्तादाचा लवकरच पर्दाफाश...
spot_img

बोगस स्वाक्षरी प्रकरण अंगलट येणार बल्लारपुरातील शिक्षण क्षेत्रातील त्या वस्तादाचा लवकरच पर्दाफाश होणार

बोगस स्वाक्षरी प्रकरण अंगलट येणार बल्लारपुरातील शिक्षण क्षेत्रातील त्या वस्तादाचा लवकरच पर्दाफाश होणार 

श्रेयश वानखेडे:  
बल्लारपूर शहर तीन भागांमध्ये विभागले जाते. त्यापैकी फक्त एका भागात असलेल्या काॅन्व्हेट च्या  तक्रारी करून आपल्या संबंधित व्यक्तीला किंवा व्यक्तीच्या काॅन्व्हेट  लाभ पोहोचवण्याच्या स्थितीत सदर तक्रार करण्यात आलेली आहे असे निदर्शनात आले आहे. त्या बाबतीत संबंधित विभागाला माहितीचा अधिकार 2005 अन्वये सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात आलेले आहे. यात शिक्षण उपसंचालक कार्यालय नागपूर यांची भूमिका संशयास्पद वाटते कारण त्यांचे म्हणणे आहे की,  आम्हाला याबाबत काही माहिती नाही.
आश्चर्याची बाब ही आहे की, कार्यालयात आलेले प्रत्येक पत्र शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या  अवलोकना शिवाय पुढे जात नाही.
याबाबत गटशिक्षण अधिकारी  पंचायत समिती बल्लारपूर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, माझ्याकडे पत्र 26 तारखेला मान. माध्यमिक शिक्षण अधिकारी चंद्रपूर यांनी अधिकारी ग्रुपवरून पाठविले. त्यांचेकडे मान. शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्या अधिकारी ग्रुप वरून सदर पत्र बिना आदेशाने दिनांक 26 तारखेला फॉरवर्ड करण्यात आले.
मान. गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती बल्लारपूर यांनी 28 तारखेला पाच काॅन्व्हेट वरती “अनधिकृत शाळा बंद” करण्याबाबत फलक लावले.
व बल्लारपूर तालुक्यातील उरल्यासुरल्या काॅन्व्हेटवर दिनांक 29, 30 मे 2024 ला लावले.
मान. गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती बल्लारपूर यांना इकडून तिकडून आदेशाची विचारणा होऊ लागली आणि जेवढे फलक यांनी लावले तेवढे यांच्याच कार्यालयाने काढले असल्याची चर्चा सुरू आहे.
मान. गटशिक्षण अधिकारी कार्यालय पंचायत समिती बल्लारपूर यांचे कडे काही काॅन्व्हेट  वाले कागदपत्रे घेऊन  विचारणा करायला गेले असता ते काहीच बोलायला तयार नव्हते. अशी चर्चा आहे  आणि याबाबत लवकरच पर्दाफाश होणार आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page