Thursday, January 22, 2026
HomeEducation७ मुख्याध्यापक पदास "ऑन द स्पॉट" मान्यता
spot_img

७ मुख्याध्यापक पदास “ऑन द स्पॉट” मान्यता

७ मुख्याध्यापक पदास “ऑन द स्पॉट” मान्यता

तब्बल नऊ तास चालली समस्या निवारण सभा

श्रेयश वानखेडे:

गडचिरोली जिल्ह्यातील विविध शाळांतील शिक्षकांनी मुख्याध्यापक पदावर पदोन्नती मिळण्याबाबत प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्याकडे सादर केला होता. मात्र, अनेक महिने लोटूनही नियमातील प्रस्तावास मान्यता देण्यास शिक्षणाधिकारी टाळाटाळ करीत होते. यावर नियमातील प्रस्तावास मान्यता देत नसल्याने रात्री कितीही वाजले तर प्रस्ताव निकाली निघाल्याशिवाय सभास्थळ सोडणार नाही, अशी तंबी आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी दिल्याने रात्री ९ वाजता ७ शिक्षकांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नतीस मान्यतेचे पत्र “ऑन द स्पॉट” देण्यात आले. याबद्दल शिक्षकांनी आमदार अडबाले सर यांचे आभार मानले.

औचित्य होते, ‘समस्‍या तुमच्या, पुढाकार आमचा’ या वि.मा.शि. संघाच्या उपक्रमाअंतर्गत दिनांक २१ जून २०२४ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक  – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्‍या निवारणार्थ मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य.), पे युनिट अधीक्षक (प्राथ./माध्य.), सर्व गटशिक्षणाधिकारी यांच्यासोबत समस्या निवारण सभा आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी जिल्हा परिषद येथे आयोजित केली होती. ही सभा दुपारी १२ ते रात्री ९ पर्यंत तब्बल ९ तास चालली.

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयात वरिष्ठ / निवड श्रेणी, वैद्यकीय देयके, पेंशन प्रकरणे, रजा रोखिकरण, मान्यता प्रकरणे व इतर प्रकरणे निकाली काढण्यासाठी दिरंगाई होत असून सेवा हमी कायद्याचे उल्लंघन होत आहे. यामुळे कार्यालयाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याबाबत वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात यावा, अश्या सूचना आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या.

यावेळी प्राथमिक व माध्यमिक विभागातील सामूहिक व वैयक्तिक समस्यांवर चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी दप्तर दिरंगाई करणाऱ्या प्राथमिक / माध्यमिक विभागातील अधिकारी – कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देश आमदार श्री. सुधाकर अडबाले  यांनी दिले. याच विषयांवर ऑगस्ट महिन्यात आढावा घेण्यात येईल असे सांगितले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आरुषी सिंग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शेलार, शिक्षणाधिकारी (माध्य.) श्री. भुसे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) श्री. पवार, कॅफो श्री. चौधरी, शमशेर पठाण सर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नैताम, जिल्हा कार्यवाह अजय लोंढे, कार्याध्यक्ष नरेंद्र भोयर, माजी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, शेमदेव चापले सर, दिलीप गडपल्लीवार, डॉ. सुरेश खंगार, अजय वर्धलवार, किशोर पाचभाई, मनोज निंबार्ते, सूरज हेमके, बापू मुनघाटे, माणिक पिल्लारे, संजय कुनघाटकर, भुवन जुमनाके, विनोद सालेकर, पोपेश्वर लडके, मुख्याध्यापक संघाचे संजय नार्लावार, मनीष शेटे व विमाशी संघाचे सदस्य, जिल्ह्यातील समस्याग्रस्त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page