श्रेयश वानखेडे:
स्वस्त धान्य दुकानदार संघ तालुका बल्लारपूर द्वारे प्रलंबित मागण्या घेऊन दिनांक: 27/06/2024 रोजी तहसील कार्यालय परिसरात धरणे आंदोलन व निदर्शने केले.
अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे च्या वतीने आपल्या प्रलंबित असलेल्या मागण्यासाठी शासनाचे लक्ष वेधावे व शासनाकडून तात्काळ कारवाई व्हावी यासाठी स्वस्त धान्य दुकानदार संघटना ने तहसील कार्यालय परिसरात निदर्शने देऊन तहसीलदार बल्लारपूर यांना निवेदन केले.
बरेच वर्षापासून स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारकांच्या मागण्या अडचणी समस्या यावर महाराष्ट्र राज्यात शासन स्तरावरून कोणतीही कारवाई व निर्णय घेण्यात आलेला नाही. नागरी पुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी राज्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली होती. त्यात राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या तसेच मार्जिन मध्ये पन्नास रुपयाची वाढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. पण त्याची अंमलबजावणी आता पर्यंत करण्यात आले नाही. हे लक्षात घेता अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाने येत्या विधान मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या प्रश्नावर चर्चा करण्याकरिता शासनाचे वेधन्याकरिता म्हणून राज्यभर महासंघाच्या वतीने आंदोलकात्मक कार्यक्रम घोषित करण्यात आले.
या आंदोलनात रास्त धान्य दुकानदार तालुका संघटनाचे अध्यक्ष भास्कर माकोडे, सचिव हेमंत मानकर, कोषाध्यक्ष प्रदीप मिरल्यावार, सदस्य सूर्यकांत साळवे, शामराव कोटरांगे, सुरेंद्र मुरकुटे, रमेश गुरु, कृष्णा दहीकर, रघु कलवला, एल एम देवतळे, सुभाष निबर्ड, नरेंद्र देवतळे इटोली परमेश्वर पुणेकर विसापूर श्रीमान बंडू विसापूर, विलास बोबडे दहेली, सारीपुत्र निरांजने लावारी, विनोद माकोडे, नितीन देव कोठारी,श्री साळवे, हनुमंताजी येंगांवार सह तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.