Wednesday, January 14, 2026
HomeYojnaमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना: कागदपत्रांच्या अटींमुळे महिलांना होणारा त्रास आणि शासनाची लापरवाही
spot_img

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना: कागदपत्रांच्या अटींमुळे महिलांना होणारा त्रास आणि शासनाची लापरवाही

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना: कागदपत्रांच्या अटींमुळे महिलांना होणारा त्रास आणि शासनाची लापरवाही

१. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अटींमुळे महिलांना प्रमाणपत्रांसाठी विविध कार्यालयांत जावे लागले.
२. शासनाने जाहीर केलेल्या जाचक अटींमुळे अनावश्यक त्रास होऊन नंतर त्या अटी शिथिल केल्या.
३. विद्यार्थ्यांची आणि शेतकऱ्यांची कागदपत्रांसाठीची गर्दी, यामुळे होणारा त्रास.
४. योजनेतून देण्यात येणाऱ्या पैशांचा आर्थिक परिणाम आणि भविष्यात महागाई वाढण्याची शक्यता.
५. योजनेच्या अटी सुलभ करून महिलांना त्रास टाळण्याचे उपाय.
श्रेयश वानखेडे:

महाराष्ट्र शासनाने महिलांच्या स्वावलंबनाकरिता जाहीर केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ या योजनेचे सर्व स्तरावरून स्वागत करण्यात आले आहे. मात्र, या योजनेच्या अटी व शर्तींमुळे महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. योजना जाहीर करताना लागू केलेल्या कागदपत्रांच्या जाचक अटींमुळे अनेक महिलांना प्रमाणपत्रांसाठी विविध कार्यालयाकडे धाव घ्यावी लागली. यामुळे कार्यालयांमध्ये मोर्चासारखी गर्दी जमली, जी शासनाच्या लापरवाहीमुळेच घडली असल्याचे स्पष्ट होते.

योजनेच्या अटींमध्ये उत्पन्नाचा दाखला, जन्माचा दाखला, टीसी अशा कागदपत्रांची आवश्यकता होती, जी अनेक महिलांकडे उपलब्ध नव्हती. त्यामुळे, या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महिलांना विविध शासकीय कार्यालयांत जावे लागले. यामुळे त्या कार्यालयांत प्रचंड गर्दी जमली. अनेक शासकीय कर्मचाऱ्यांनी या परिस्थितीचा गैरफायदा घेत महिलांकडून आर्थिक फसवणूक केली असल्याचे प्रकारही समोर आले आहेत.

श्री. राहुल श्रीराम भोयर ब्रम्हपुरी तालुका ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूर. ९४२१८१५११४
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page