स्पर्धेत टिकायचे असेल तर ज्ञान संपादन करा पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
युवा वरीयर्सने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Shreyash Wankhede:
वर्तमान युग हे स्पर्धेचे युग आहे.त्यामुळे काही प्राप्त करायचे असेल तर संघर्ष करावा लागणार आहे.स्पर्धेच्या युगातील हा संघर्ष अधिकाधिक ज्ञान संपादित करून कमी करता येऊ शकतो.यासाठी आपण गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी वाचनालय व अभ्यासिका उघडल्या आहेत.त्याचा उपयोग करा.स्पर्धेत टिकायचे असेल तर ज्ञान संपादन करा,असे प्रतिपादन राज्याचे कॅबिनेट व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केले.ते युवा वरीयर्स तर्फे ‘गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार’ कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मंगळवार(25 जून)ला प्रियदर्शीनी सभागृहात बोलत होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा वरीयर्सचे अनिकेत मगरे,रिशा भास्कर,रोहन वाडवे,पियुष वैरागडे,उत्कर्ष नागापुरे,साई सूचक,आदित्य झा,हर्षल वनकर,अहमद शेख व गणेश जामदार यांनी परिश्रम घेतले.








