Wednesday, July 29, 2026
Homeबल्लारपूरबुद्ध जयंती निमित्त "बुद्धपहाट" कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न
spot_img

बुद्ध जयंती निमित्त “बुद्धपहाट” कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न

बुद्ध जयंती निमित्त “बुद्धपहाट” कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न

श्रेयश वानखेडे:
भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार समिती द्वारा बुद्ध जयंती निमित्त आयोजित तथा “पाखरे निळ्या नभाचे” म्यूजिकल ग्रुप अमरावती प्रस्तुत “बुद्ध पहाट” हा सुश्राव्य बुद्ध भीम गीतांचा संगीतमय कार्यक्रम प्रेक्षकांच्या भव्य उपस्थितिमधे यशस्वीरित्या संपन्न झाला. बुद्ध विहारासमोरिल भव्य पटांगणावर संपन्न झालेल्या या कार्यक्रमाची मुख्य आकर्षण ठरली ती नऊ वर्षाची बालिका शिरीषा वीर. अतिशय सुमधुर आणि भारदस्त आवाजाने एकापेक्षा एक सुंदर बुद्ध भीम गीते प्रस्तुत करुन तीने उपस्थित सर्व श्रोत्याना मंत्रमुग्ध केले. पहाटे ठीक ५.३० वाजता बिहारावरील धम्मध्वजाचे ध्वजारोहण तुलसीदास खैरे यांचे हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. बाबासाहेबांच्या पूर्णाकृति पुतळ्याला जयदास भगत यांनी माल्यार्पण केल्यानंतर त्रिशरण, पंचशील, बुद्धपूजा आणि त्रिरत्न वंदना घेन्यात आली. आदल्या दिवसी प्रबोधनाचा कार्यक्रम ही संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर भगत यांनी केले. संगीता घोटेकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जनतेची उपस्थिति होती.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page