*राजुरा पोलीसांनी गांजा अंमली पदार्थ बाळगुन वाहतुक करणाऱ्या दोन आरोपींना अटक*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
पोलीस स्टेशन राजुरा हद्दीत दिनांक 08/08/2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक हिरो मो.सा.क्र टी.एस 20 सी.1109 या गाडीवर दोन इसम गांजा या अंमली पदार्थ बाळगुन राजुरा मध्ये वाहतुक करणार आहे.
अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे एन.डी.पी.एस कायदयाअंतर्गत तंतोतंत पालन करुन रेड करणेकामी मुखबीरने सांगितलेल्या प्रमाणे नाकेबंदी करुन यातील नमुद इसमांचे ताब्यातील मो.सा.क्र टी.एस 20 सी.1109 ची व बॅगची झडती घेण्यात आली असता बॅगमध्ये एका हिरव्या रंगाच्या प्लॉस्टीक पिशवीमध्ये खाकी रंगाचे सेलोटेपने गुंडाळुन असलेल्या प्लॉस्टीक पिशवी ज्यामध्ये पाने, फुल देठे, बोंड बिया हिरवट, काळपट रंगाचा, ओलसर – चांब्रट असलेला गांजा सदृश्य अंमली पदार्थ एकुण 950 ग्रॅम कि.अं 18,000/- रु, गांजा करीता वापरलेली मोरपंखी रंगाची बॅग कि.अं 500/- रु व गांजा वाहतुकीकरता वापरलेली एक हिरो कंपनीची एच .एफ डिलक्स मो.सा.क्र टि.एस 20 सी. 1109 कि.अं 85,000/- असा एकुण 1,03,500/- रु चा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी विरुध्द अप.क्र .663/2026 कलम 8 (क) ,20 (ब),22 (ब) NDPS Act अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.