माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे सेवा पंधरवाड्याच्या दरम्यान लेखा परीक्षणच्या नावाखाली मालसुतो अभियान

एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात शासनाने सेवा पंधरवाडा सुरू केला असून, मोफत सेवा पुरवणे सुरू केले आहे.
परंतु माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे लेखा परीक्षणाच्या नावाखाली दिनांक: 01/08/ 2024 ला येणाऱ्या शाळांकडून प्रत्येकी 5000 रुपये गोळा केल्याची खमंग चर्चा सुरू आहे.
हा पैसा गोळा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने अभियानाचा फज्जा उडवून खास माणूस नियुक्त केल्या असल्याची चर्चा जोरासोरात रंगत आहे. त्या व्यक्तीशी फोनवर संवाद साधला असल्यानंतर त्याने सांगितले की, जेवणाखाण्याचा खर्च सुद्धा त्याच पैशातून भागवल्या असल्याची खात्रीलायक बातमी समोर येत आहे.
त्या व्यक्तीशी फोनवर चर्चा झाल्यानंतर त्याने सांगितले की, हे सर्व लेखापरीक्षण होऊन संबंधित शाळाचे लेखापरीक्षण अहवाल, योजना विभागाला गेले आहे तेथून वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी या विभागाला जाणार आहे.
या कार्यालयामध्ये भोनबा बुलाई चा खेळ रंगत असून खालून वर पर्यंत सेटिंग जोरदार प्रमाणात सुरू असल्याची खात्रीलायक वृत्त समोर आले आहे. तसेच घपला करून पाच हजार रुपये द्या आणि लेखापरीक्षण करून मोकळे व्हा. हा नारा सेवा पंधरवड्यात अधिकाऱ्यांनी लावणे जोरासोरात सुरू केले आहे. यासाठी त्यांनी खास एजंटची नेमणूक केलेली आहे हे एजंट खाली असलेल्या चहाच्या दुकानात संबंधिताची भेट घेऊन तेथेच सर्व देवान घेवान चालत असल्याची चर्चा हाती आलेली आहे.
कार्यालयाची सुट्टी झाल्याच्या नंतर सुद्धा अधिकारी सायंकाळी सात वाजेपर्यंत ऑफिसमध्ये दलाला आणि चमचा मार्फत पैसे गोळा करण्यासाठी बसत असल्याची चर्चा सुद्धा विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.