बल्लारपूर येथे 24 वी राष्ट्रीय कराटे सेमिनार 2024 संपन्न
श्रेयश वानखेडे:
दि. 03/08/2024 व 04/08/2024 ला बल्लारपूर येथे 24 वी राष्ट्रीय कराटे सेमिनार कॅम्प 2024 महाराष्ट्र मध्ये घेण्यात आले होते. या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाला आय एस के एफ महाराष्ट्र व शौर्य कराटे क्लब बल्लारपूर च्या वतीने बल्लारपुर क्रिडा संकुल बल्लारपुर विसापुर येथे आयोजित केले होते या मध्ये भारताच्या इतर राज्यातुन प्रशिक्षक प्रशिक्षण देण्याकरिता आले होते. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मुख्य अतिथि म्हणुन मा.श्री.चंदनसिंह चंदेल माजी वन विकास महामंडळ अध्यक्ष एफ.डी.सि.एम , श्री.काशिनाथ सिंग बल्लारपुर शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, श्री.गोपाल रेड्डीजी मंदावार जनहीत अधिकार समिती अध्यक्ष, श्री.कुजबिहारी बटघरे सर सेवानिवृत्त मुख्यध्यापक, श्री.ॲड.रनंजय सिंह बल्लारपुर शहर अध्यक्ष युवा मार्चा भा.ज.पा,श्री.आनंद ओदलवार (मास्टर) सामाजिक कार्यकर्ता आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात द्विप प्रज्वलने केली त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन आणि बाहेर राज्या वरुन आलेल्या कराटे प्रशिक्षक श्री.विजय हजारीका (आसाम) श्री.देवाशिष् शेकाया (अरुणाचल प्रदेश),अमन कुमार (बिहार),सुदामा कुमार (यु.पि),श्री.बालप्पा दुरादुंटटी (कर्नाटक) श्री.विकास बंसल (हरीयाणा) हयांचे स्वागत अतिथी च्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे मुख्य उद्देश्य मुलांना शालेय खेळ व कराटे प्रतियोगीता मध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्र्रीय प्रतियोगीता मध्ये आपल्या राज्याचे नाव गौरवण्यात येईल या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी हयांनी कार्यक्रमाचे आयेजक मा.संजिव कुबडे सर व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले या कार्यक्रमाला आलेल्या इतर राज्याचे कराटे प्रशिक्षक यांचे आभार मानले मुलांना पुढिल प्रतियोगिते करिता शुभेच्छा दिल्या तसेच या प्रशिक्षणा करिता चंद्रपुर जिल्हयांच्या कान्या कोपऱ्यातुन मुलांनी या कार्यक्रमात भाग घेतले कार्यक्रमाला यशस्वी करण्या करिता श्री.संजिव कुबडे,श्री.अजय खोब्रागडे,श्री.विकास देशभ्रतार श्री.अनिल संटीवार , श्री.संजय पारधी श्री.सतीशबाबु अग्रवाल, श्री.कुणाल कुबडे, श्री.रोहन सिमलावार, श्री. चेतन्य कुबडे,कु.उन्नती भोंडे,कु.तृषा खोब्रागडे, शौर्य कराटे क्लब बल्लारपूर व शौर्य बहुउद्देशीय संस्था चे संपुर्ण सदस्यांनी या मध्ये आपले योगदान दिले , या सेमिनार चे मुख्य आयोजक आय.एस.के.एफ.इंडिया चे फांऊडर व रयु आय. एस. के. ए.सेन्सेई शिव के. पांचाल (यु.ए.ई) हयांच्या अध्यक्षे खाली घेण्यात आले कार्यक्रमाचे संचालन श्री.अजय खोब्रागडे हयानी केले व आभार प्रदर्शन श्री.संजिव कुबडे हयांनी मानले .