Wednesday, February 11, 2026
HomeFestivalsजनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा
spot_img

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा

श्रेयश वानखेडे:

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत  78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
प्रथमता: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला उपस्थित मान्यवरांचे हस्ते माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. आर. के. वानखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांची अगुबाई श्री. एस. एम. चव्हाण स्काऊट गाईड शिक्षक यांनी केले.
 घेण्यात आलेल्या  सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेचे विद्यार्थी अथर्व हिकरे, अवनी पेटकर, त्रिशाली महानंद, रोनक किन्नाके, आनंदी गवई, राशी वेले आदी विद्यार्थ्यांनी भाषण व गीत गायन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मान. बी. बी. भगत, मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे आर. के. वानखेडे ज्येष्ठ शिक्षक व प्रमुख उपस्थिती एम.डी. टोंगे, यु. के. रांगणकर यांची होती.
 उपस्थितांना एम. डी. टोंगे, आर. के. वानखेडे तसेच अध्यक्षीय भाषण बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी  केले.
कार्यक्रमाचे संचालन आर. बी. अलाम व आभार प्रदर्शन एस. एन. लोधे मॅडम यांनी केले.
कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गणेश चंदावार, वामन बोबडे, जगदीश कांबळे, वाल्मीक खोंडे, इंद्रभान अडबाले सहित पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी  विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page