Monday, January 19, 2026
Homeबल्लारपूरपत्रकारांची मानहानी करणाऱ्या डॉ. सतीश बंडावार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी
spot_img

पत्रकारांची मानहानी करणाऱ्या डॉ. सतीश बंडावार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी

पत्रकारांची मानहानी करणाऱ्या डॉ. सतीश बंडावार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी

श्रेयश वानखेडे:

कोलकत्ता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार निषेध आंदोलनात दिनांक: 17/08/2024 रोजी बल्लारपुरातील डॉक्टरांचे प्रतिनिधी मंडळ पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे मान. पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यास पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांच्या दालनात गेले असता, निवेदन दिल्यानंतर डॉ. सतीश बंडावार यांनी मौखिक चर्चा करतेवेळी पत्रकार पैसे मागतात, धमक्या देतात, त्रास देतात अशा आशयाचे वक्तव्य केले.त्यामुळे स्थानिक पत्रकारांची मोठी बदनामी झाली आहे.
डॉ. सतीश बंडावार यांच्या वक्तव्याने पत्रकारांच्या भावना दुखावल्या गेल्या असून, डॉ. सतीश बंडावार यांना पत्रकारांची बदनामी करण्याचा नैतिक अधिकार कोणी दिला? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.  कृपया या लेखी निवेदन/ तक्रारीची दखल घेऊन डॉ. सतीश बंडावार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन/ तक्रार पत्र मान. पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बल्लारपूर यांना दिनांक:19/08/ 2024 रोजी पत्रकारांच्या एका शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page