Saturday, August 1, 2026
spot_img
Homeबल्लारपूरबल्लारपूर येथील मोफत रोग निदान शिबिरात 1244 जणांनी उपचारासाठी नोंदणी

बल्लारपूर येथील मोफत रोग निदान शिबिरात 1244 जणांनी उपचारासाठी नोंदणी

बल्लारपूर येथील मोफत रोग निदान शिबिरात 1244 जणांनी उपचारासाठी नोंदणी 

श्रेयश वानखेडे:
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या द्वारे बल्लारपूर येथे आज सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १२४४ जणांनी उपचारासाठी नोंदणी केले होते. आशा हॉस्पिटल नागपूर आणि चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय येथील डॉक्टरांची चमू यांनी उपस्थित राहून बीपी, हृदयविकार, मानसिक रोग, कॅन्सर, डोळे, कान – नाक – घसा, त्वचा रोग आदी आजारांच्या उपचारांसाठी लोकांची तपासणी करून नोंदणी केली आहे. चाचणीत अत्यंत तातडीच्या रुग्णांना उद्या सकाळी ९ वाजता बसने उपचार व ऑपरेशनसाठी आशा हॉस्पिटल नागपूर येथे पाठविण्यात येणार आहे. शिबिरात आज दुपारी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.
       या मोफत महाआरोग्य शिबिराच्या मार्गदर्शन पथकात वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, काशिनाथ सिंग, रेणुका दुधे, शिवचंद्र द्विवेदी, समीर केणे, नीलेश खरबडे, राजू दारी, रणंजय सिंग, वैशाली जोशी, देवराव निंदेकर यांचा समावेश होता. सदर शिबिर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आशा हॉस्पिटल नागपूर, शंकरा सुपर स्पेशालिटी नागपूर आणि सर्जिकल ऑन्कोलॉजी कॅन्सर केअर सेंटर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. या मोफत शिबिराचा सर्वसामान्य नागरिकांनी लाभ घेतला आहे.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page