Saturday, March 14, 2026
Homeबल्लारपूर" बल्लारपूर शहरातील शिक्षण व्यवस्था सुधारण्याकरिता नगरपरिषदला नकीच बाध्य करू "-आम आदमी...
spot_img

” बल्लारपूर शहरातील शिक्षण व्यवस्था सुधारण्याकरिता नगरपरिषदला नकीच बाध्य करू “-आम आदमी पक्ष.

” बल्लारपूर शहरातील शिक्षण व्यवस्था सुधारण्याकरिता नगरपरिषदला नकीच बाध्य करू “-आम आदमी पक्ष.

-सक्तीचे व मोफत शिक्षण आमचे संवैधानिक अधिकार असताना अधिकारी कोणत्या दबावात काम करत आहेत?

श्रेयश वानखेडे:

आम आदमी पक्षातर्फे बल्लारपूर शहरातील नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांचे 15 ऑगस्ट पूर्वी निरीक्षण दौरा करण्यात आला, या दौऱ्यात सर्व शाळांची अवस्था दयनीय परिस्थितीत आहे, असे आम आदमी पक्षाने जाहीर केले आहे. 15 ऑगस्ट जाऊन ऑगस्ट 2024  ओलांडले असताना देखील आता पर्यंत सर्व विद्यार्थांना शिक्षण साहित्य पाठ्यपुस्तक, बुक, कपडे, दप्तर, जोडे व इतर आवश्यक असलेली सामग्री  मिळालेले नाही.  एकूण चौदा शाळांपैकी साईबाबा प्राथमिक, गांधी माध्यमिक, सरदार पटेल प्राथमिक शाळा (विभाग डेपो) व आंबेडकर प्राथमिक शाळा (बस्ती), या चार शाळा सोडले तर बाकीचे सर्व शाळांमध्ये विद्यार्थांकरिता वर्ग खोल्यांची कमतरता भासत आहे. सर्व शाळांमध्ये सफाई कर्मचारी व शिक्षकांची संख्या कमी आहे. साईबाबा प्राथमिक शाळेत आपच्या प्रयत्नामुळे डागडुगीचे काम चालू झाले आहे. पण तेही कागदावर पहिलेच नोंदविण्याचे प्रकार दिसत आहे. दोन शाळा सोडले तर कोणत्याही शाळेत विद्यार्थांना शिस्त शिकविण्याचे कोणतेही प्रयत्न करतांना शिक्षक  दिसत नाही. तर नगरपरिषदेचे अधिकारी देखील लक्ष देत नाही. सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची खूप मोठी गरज आहे. आम आदमी पक्षाच्या दबावाने क्रीडा साहित्य तर देण्यात आले. पण क्रिडा प्रशिक्षण देण्याकरिता कुठ्ल्याही शाळेत क्रिडा शिक्षक नाही. तरी शिक्षण अधिकारी, प्रशासक, गट शिक्षण अधिकारी, प्रशासक शिक्षण अधिकारी व शिक्षक डोळे बंद करून आहेत, ज्या शिक्षणाच्या भरोश्यावर अधिकारी व शिक्षक तयार झालेत, त्याच शिक्षणाची हत्या करण्याच्या प्रयत्नात हे सर्व अधिकारी पण दोषी राहतील, असे पुप्पलवार यांनी मत मांडले आहेत. बल्लारपूर शहरातील सर्व गोर-गरिबांच्या गरजू चिमुकल्यांच्या भवितव्यासाठी आम्ही असेच सतत प्रयत्नशील राहणार. अधिकारी शिक्षणाला दुर्लक्ष करत आहे. पण असा हलगर्जीपणा आता तरी बल्लारपूर शहरात आम आदमी पार्टी खपवून घेणार नाही. लवकरच शाळांची पुन्हा एकदा LIVE निरीक्षण दौर करणार व भविष्यात शिक्षण सुधारणा करण्याचा बाबतीत आमची भुमिका तीव्र करू. असे “AAP” चे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी आव्हान केले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page