Wednesday, August 26, 2026
spot_img
HomeEducationमहाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मुंडन व धरणे आंदोलन संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मुंडन व धरणे आंदोलन संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मुंडन व धरणे आंदोलन संपन्न.

श्रेयश वानखेडे:

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट स्कूल विभागातर्फे आज दिनांक 4 सप्टेंबरला जिल्हा परिषद चंद्रपूर समोर मुंडन व धरणे  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

  शासन व प्रशासनाच्या वेळ काढून धोरणा मुळे कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना, विद्यार्थी व पालकांना न्याय मिळवून देण्यास शालेय प्रशासन अपयशी ठरल्यामुळे त्यांच्या निषेधार्थ मुंडन व धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मीना साळुंखे, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांना याप्रसंगी खालील मागण्याचे निवेदन देण्यात आले.

1) कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना MEPS 1981 नियम 9(5) अनुसूचि ड प्रमाणे नियुक्ती आदेश व शासन मान्यता देण्यात यावी.

2) दुय्यम सेवा पुस्तिकेची प्रत देण्यात यावी.

3) कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना MEPS 1981 नुसार पूर्ण वेतन,CL,EL देण्यात यावे.

4) कॉन्व्हेंट शाळेत 90% महिला शिक्षिका कार्य करीत असून त्यांना प्रसूती पूर्व रजा वेतनासह देण्यात याव्या.

5) शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यास त्याला ग्रॅच्युइटी देण्यात यावी.

6) कॉन्व्हेंट स्कूल येथे शिक्षण घेत असलेल्या गरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांन करिता महाराष्ट्र शासनाद्वारे लागू असलेल्या राजश्री शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ मिळवून द्यावा.

7) कॉन्व्हेंट शिक्षण संस्थाचालक वारंवार MEPS 1981 कायद्याची उल्लंघन करून कार्यरत शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे व विद्यार्थी पालकांचे आर्थिक व मानसिक शोषण करीत आहे. याकरिता शिक्षण संस्था चालकांच्या विरोधात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हा नोंदविण्याबाबत व अंतिम निकाल लागेपर्यंत त्याला नोकरीत संरक्षण देण्याबाबत शासनाने प्रभावी कायदा करावा.

8) माननीय शिक्षण उपसंचालक यांचा 10 ऑगस्ट 2020 चा आदेश तात्काळ लागू करावा.

9) माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ केस नं.3522/2016 रंजना जोशी व इतर विरुद्ध ज्ञानमाता विद्या विहार (अल्पसंख्यांक शाळा) नांदेड चा  दि.21/03/2017 सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या निकालाची अंमलबजावणी राज्यात ताबडतोब करावी.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे धरणे व मुंडन आंदोलनात नागपूर विभागाचे अध्यक्ष अजय वानखेडे, उपाध्यक्ष विनोद पांढरे, विभाग कार्यवाह सुभाष गोतमारे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष विलास खोंड, कॉन्व्हेंट विभाग अध्यक्ष विवेक आंबेकर, प्रवीण कडू, अतुल घरोटे, वसंत वडस्कर, देविदास चवले ,सुधीर पाचखेडे , विकास नंदुरकर, विनायक कावडकर प्रदीप रत्नावार, यादव पजई, प्राथमिक विभाग प्रमुख सौ सरिता सोनकुसरे, सौ कविता कोटेवार तथा शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचा

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page