दीर्घकाळ प्रलंबित असणार्या जिव्हाळ्याच्या रास्त मागण्यांच्या आग्रह व्यक्त करण्यासाठी दिनांक 21 एप्रिल 2026 पासून राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षक बेमुदत संपावर जातील
ज्योत्स्ना वानखेडे:
राज्यभरातील 17 लाख सरकारी कर्मचारी- शिक्षक, गेले वर्षभराहून अधिक कालावधीत नवागत युती शासनाकडून प्रलंबित मागण्या संबंधात न्याय मिळेल या प्रतीक्षेत होते. त्यांनी सतत आंदोलनात्मक कृती करून रास्त प्रलंबित मागण्याकडे शासनाचा लक्षवेध करण्यासाठी लोकशाही पद्धतीने प्रयत्न केले.
शासनाशी सलोखा-सुसंवाद ठेवून प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत अशी अपेक्षा होती. परंतु सर्वच मागण्याबाबत शासन दुर्लक्ष करीत असल्याचे वास्तव समोर उभे आहे. त्यामुळे राज्यातील 17 लाख कर्मचारी- शिक्षक त्यांची नाराजी व्यक्त करण्यासाठी मंगळवार दिनांक 21 एप्रिल 2026 पासून राज्यभर बेमुदत संपावर जाण्याचा कटू निर्णय, दिनांक 7 मार्च 2026 रोजी पार पडलेल्या सरकारी- निमसरकारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या विस्तृत बैठकीत घेण्यात आला.
तसे पत्र मान. नाम. श्री. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना मान. जिल्हाधिकारी चंद्रपूर मार्फत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र जिल्हा शाखा- चंद्रपूरच्या वतीने दिनांक: 17/03/2026 रोजी देण्यात आलेले आहे.