Monday, January 19, 2026
HomeEducation16 शिक्षकांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड
spot_img

16 शिक्षकांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड

16 शिक्षकांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड

चंद्रपूर(जीमाका) 
चंद्रपूर जिल्ह्यातून 16 शिक्षकांची  जिल्हा शिक्षक पुरस्काराकरिता निवड झाली आहे. 5 सप्टेंबर रोजी शिक्षण दिनी कर्मवीर दादासाहेब मा.सा. कन्नमवार सभागृह, जिल्हा परिषद येथे जिल्हा शिक्षण पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
निवड झालेल्या शिक्षकांमध्ये प्राथमिक विभागातून जगदीश मेहर (जि.प.उ.प्रा. शाळा तुजनमाल, ब्रम्हपुरी), वंदना बोढे (जि.प.उ.प्रा. शाळा चारगाव, भद्रावती), राजानंद दुधे (जि.प.उ.प्रा. शाळा सिदूर, चंद्रपूर), कविता लोथे  (जि.प.उ.प्रा. शाळा कवडशी (डाक), चिमूर), गणेश आसेकर (जि.प.उ.प्रा. शाळा चेकलिखितवाडा, गोंडपिपरी), प्रशांत कवासे (जि.प.उ.प्रा. शाळा गडीसुर्ला, मुल), नरेंद्र वासनिक (जि.प.उ.प्रा. शाळा नवेगाव हुंडेश्वरी,नागभिड),  दिलीप मडावी (जि.प.उ.प्रा. शाळा  धिडसी, राजूरा), महेंद्र खोब्रागडे (जि.प.उ.प्रा. शाळा नाचणभट्टी, सिंदेवाही), मनीषा चवले (जि.प.उ.प्रा. शाळा बोरगाव (शि),वरोरा), गोविंद पेदेवाड (जि.प.उ.प्रा. शाळा लालगुडा, कोरपना), रामलाल पमार (जि.प.उ.प्रा. शाळा चकपिरंजी, सावली), किसन अलाम (जि.प.उ.प्रा. शाळा मानोरा, बल्लारपुर),  सुलक्षना गायकवाड (जि.प.उ.प्रा. शाळा  मोहाडा (रै), पोंभूर्णा), नागनाथ बोरुळे  (जि.प.उ.प्रा. शाळा  आंबेझरी, जिवती) तर दिव्यांग/ विशेष /कला शिक्षक पुरस्कार गटातून बालाजी सोळंके (जि.प.उ.प्रा. शाळा  पुडियाल मोहदा, जिवती) यांची निवड झाली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page